ETV Bharat / sitara

सेलिन डायोन आणि सॅम हेगेनसोबत हॉलिवूड चित्रपटात झळकणार प्रियंका चोप्रा - Grammy-winning Celine Dion

प्रियंका चोप्रा जोनासने आपल्या आगामी हॉलिवूड चित्रपटाची घोषणा केली आहे. यात ती ग्रॅमी-विजेता सेलिन डायोन आणि अभिनेता सॅम हेगेन यांच्यासोबत काम करीत आहे.

Priyanka Chopra
प्रियंका चोप्रा
author img

By

Published : Oct 28, 2020, 7:04 PM IST

लॉस एंजेलिस - प्रियंका चोप्रा जोनास ग्रॅमी-विजेता सेलिन डायोन आणि अभिनेता सॅम हेगेन यांच्यासोबत हॉलिवूडच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. हा एक नाट्यमय रोमँटिक चित्रपट आहे.

प्रियंकाने या घोषणेचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्विटमध्ये लिहिलंय, "मी अनेक अद्भूत लोकांसह हा आश्चर्यकारक चित्रपट सुरू करण्यास उत्सुक आहे! जिम स्ट्रॉस, सॅम हेगेन, सेलिन डायन. हा माझ्यासाठी सन्मान आहे."

व्हरायटी डॉट कॉमच्या वृत्तानुसार, जिम स्ट्रॉस लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट सोफी क्रॅमरच्या कादंबरीवर आधारित जर्मन भाषेतील ''एसएमएस फर डिच'' या चित्रपटाचा इंग्रजी रिमेक आहे.

'आउटलँडर' या हिट मालिकेचा अभिनेता आणि निर्माता म्हणून हेगेनला ओळखले जाते. “मी या अतुल्य कलाकारांमध्ये सामील होण्यास उत्साहित आहे,” असं हेगेनने इंस्टाग्रामवर लिहिलं आहे.

प्रियांका यानंतर आगामी ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटात दिसणार असून त्यामध्ये ती कार्यकारी निर्माता देखील आहे. याशिवाय रॉबर्ट रॉड्रिग्ज दिग्दर्शित ‘वी कॅन बी हीरोज’ मध्ये आपल्याला दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.