ETV Bharat / sitara

निक जोनास - प्रियांका चोप्राच्या वयाबाबत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, 'देसी गर्लने' दिलं 'असं' उत्तर - age difference

प्रियांका आणि निकच्या वयात तब्बल १० वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या वयातील अंतरावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. मात्र, प्रियांका आणि निक या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून आपले वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहेत.

प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे निक, मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला 'देसी गर्लने' दिले 'असे' उत्तर
author img

By

Published : Jun 6, 2019, 12:58 PM IST

मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी गतवर्षीच लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी त्यांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. प्रियांका आणि निकच्या वयात तब्बल १० वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या वयातील अंतरावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. मात्र, प्रियांका आणि निक या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून आपले वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहेत.

अलिकडेच एका माध्यमाच्या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या आणि निकच्या वयातील अंतराबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना प्रियांका म्हणाली, की 'लोक नेहमी आमच्या वयातील अंतरामुळे आम्हाला ट्रोल करतात. एखादा पुरुष त्याच्यापेक्षा लहान महिलेसोबत रोमान्स करत असेल, तर त्याबाबत त्यांना काहीही समस्या नसते. मात्र, तेच जर महिलेबाबत असेल तर लोक त्यांना ट्रोल करतात'.

प्रियांका आणि निक दोघांनीही मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली होती. जोधपूरच्या उमैदभवनमध्ये दोघांचाही भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतरही या जोडीची बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात.

प्रियांका नेहमी निकचे कौतुक करताना दिसते. 'निक वयाने जरी माझ्यापेक्षा लहान असला, तरी तो मला प्रत्येक गोष्टीत समजून घेतो. माझ्या प्रत्येक गोष्टीत मला साथ देतो. त्यामुळे मी त्याला ओल्ड जोनास असे नाव दिले आहे', असेही प्रियांकाने म्हटले होते.

Intro:Body:

ENT 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.