मुंबई - 'ग्लोबल स्टार' म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही तिने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिचा फॅशन सेन्स असो, किंवा महागडी स्टाईल ती नेहमी कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील तिच्या लूकमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. रेड कार्पेटवर तर तिने सर्वांवर भूरळ पाडलीच आहे. मात्र, तिच्या महागड्या स्टाईलनेही सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
प्रियांकाने अलिकडेच तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. कान्समध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने तिच्या घड्याळाचा फोटो शेअर करून ती 'कान्स'ची तयारी करत असल्याचे सांगितले होते. निक जोनाससोबतचेही तिचे बरेचसे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्येही तिच्या या घड्याळाने लक्ष वेधले आहे. या घड्याळाची किंमतही तेवढीच लक्षणीय ठरली आहे.
प्रियांकाने 'Chopard' या ब्रॅन्डची घड्याळ हातात घातल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळते. हिरेजडीत असेलली ही घड्याळ तब्बल २६ लाख ५४ हजार एवढ्या किमतीची आहे. तिच्या या घड्याळाच्या किमतीत बऱ्याच महागड्या कार खरेदी करता येतील. या घड्याळावरून प्रियांकांच्या महागड्या स्टाईलचा अंदाज चाहत्यांना लावता येईल.