मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला मागच्या वर्षी एक वर्ष पूर्ण झाले आहे. सोशल मीडियावर दोघांचीही क्रेझ जरादेखील कमी झालेली नाही. त्यांचे नवनवीन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. निक जोनासच्या गाण्यांचीही चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळते. जोनास ब्रदर्सच्या नव्या गाण्यानेही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
प्रियांकाने जोनास ब्रदर्सच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'व्हाट मॅन गॉट डु', असे हे गाणं आहे. या गाण्यात निकसोबत त्याचे दोन्ही भाऊ जो आणि केवीन हे देखील गाणं गाताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या तिघांच्याही पत्नींचा समावेश या व्हिडिओमध्ये आहे.
हेही वाचा -ट्विंकल अन् अक्षयचं 'असे' आहे वैवाहिक आयुष्य, लग्नाच्या १९ वर्षानंतर अक्षयने केला उलगडा
प्रियांका आणि निक नेहमीप्रमाणेच या व्हिडिओतही रोमॅन्टिक अंदाजात दिसतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या गाण्यापूर्वी जोनास ब्रदर्सचा 'सकर्स' हा व्हिडिओ देखील खूप गाजला होता. त्यांना या गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, प्रियांका चोप्राने 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसिम यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळाल्या. आता राजकुमार रावसोबतही ती 'व्हाईट टायगर' या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा -'थलायवी': एमजीआर यांच्या भूमिकेतील अरविंद स्वामींची पहिली झलक