मुंबई - जेव्हा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखायचा असतो तेव्हा प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे आपल्या कामातून वेळ काढून एखाद्या रम्य ठिकाणी वेळ घालवतात. अलीकडेच, या जोडप्याने त्यांच्या कुटुंबीयांसह समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद लुटला. प्रियांकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
प्रियांका आणि निकचा अतिशय कुल अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. एका फोटोमध्ये निक प्रियांकाच्या गालावर किस करताना पाहायला मिळतो.
हेही वाचा -'तुम्हाला भूक लागलीये का', रणवीरबाबतच्या 'त्या' प्रश्नामुळे भडकली दीपिका
दुसऱ्या फोटोमध्ये या क्युट जोडीसोबत त्यांचे कुटुंब समुद्राकडे पाहत कॅमेराकडे पाठ करुन उभे असलेले दिसतात.
प्रियांका चोप्राने यापूर्वी या बीचच्या सुट्टीतील आणखी काही फोटो शेअर केले होते.
हेही वाचा -'छपाक'चं टायटल ट्रॅक प्रदर्शित, लॉन्च सोहळ्यादरम्यान लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाही भावूक
दरम्यान, फ्लोरिडामधील जोनास ब्रदर्सच्या मैफिलीसह निक - प्रियांकाने नव्या वर्षाचे स्वागत केले होते. कामाबद्दल बोलतांना, प्रियांका नेटफ्लिक्सच्या 'व्हाईट टायगर'मध्ये दिसणार आहे. जिथे ती पहिल्यांदा राजकुमार रावसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. हा चित्रपट अरविंद अडीगा यांच्या त्याच नावाने सर्वाधिक विक्री झालेल्या कादंबरीचे रूपांतर आहे.
हेही वाचा -अथिया-केएल राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया