ETV Bharat / sitara

'चोरी चोरी चुपके चुपके'ला १९ वर्षे पूर्ण, आठवणीत रमली प्रिती झिंटा - Abbas Mastan latest news

सलमान खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका असलेल्या 'चोरी चोरी चुपके चुपके' चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. अब्बास मस्तान यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची व्हिडिओ क्लिप प्रितीने शेअर केली आहे.

Preity Zinta
प्रिती झिंटा
author img

By

Published : Mar 10, 2020, 12:00 AM IST

मुंबई -अभिनेत्री प्रिती झिंटाचा २००१ मध्ये रिलीज झालेल्या 'चोरी चोरी चुपके चुपके' चित्रपटाला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. अब्बास मस्तान यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात प्रितीसह सलमान खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

प्रितीने इन्स्टाग्रामवर 'चोरी चोरी चुपके चुपके' चा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती सलमानसह दिसत आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिलंय, ''' चुपके चुपके 'मध्ये खूप मजा आली. मला अब्बास मस्तान, सलमान खान, राणी मुखर्जी, अमरिश पुरी यांच्यासह क्रूसोबत काम करताना मजा आली. माझा सर्वात क्रेझी रोल...किती रिसर्च केला, खूप नर्व्हस होते, मात्र त्यावेचा अनुभव खूप मजेशीर होता. अब्बास मस्तान, सलमान आणि राणीचे आभार. सर्वांनी चांगले काम केले आणि उत्तम सिनेमा बनवला.''

'चोरी चुोरी चुपके चुपके' आजपासून १९ वर्षापूर्वी म्हणजेच ९ मार्च २००१ ला रिलीज झाला होता. त्यावेळी हा चित्रपट हिट ठरला होता. यात सरोगसीचा विषय हाताळण्यात आला होता.

प्रितीने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी भरपूर कॉमेंट्स केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.