ETV Bharat / sitara

प्रथमेश परबसोबत झळकणार सिद्धार्थ जाधव, पोस्टर प्रदर्शित - शिल्पा ठाकरे

'खिचिक'च्या टीजरमध्ये प्रथमेशचा हटके लूक पाहायला मिळाला. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावातून फारसं काही कळत नसल्याने चित्रपटाची कथा गुलदस्त्यात आहे.

प्रथमेश परबसोबत झळकणार सिद्धार्थ जाधव, पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Aug 17, 2019, 8:24 AM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील विनोदी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब दोघेही आगामी चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. आता दोन विनोदी कलाकार एकत्र येणार म्हटल्यावर चित्रपटाचं नावही हटके आहे. 'खिचिक' असं या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'खिचिक'च्या टीजरमध्ये प्रथमेशचा हटके लूक पाहायला मिळाला. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावातून फारसं काही कळत नसल्याने चित्रपटाची कथा गुलदस्त्यात आहे.

आता चित्रपटाच्या पोस्टरवर सिद्धार्थचाही आगळावेगळा लूक पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे'ईच‌क वाचक करीत समद्यांना शोधायले येऊन राहिलाय.. खिचिक!', असे वैदर्भीयन भाषेत असलेले कॅप्शनही त्याने या पोस्टरवर दिले आहे.

सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब यांच्याव्यतिरिक्त सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण, यश खोंड, हे कलाकार 'खिचिक'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.