मुंबई - प्रतीक बब्बरने 'बागी २' चित्रपटात खलपुरुषाची भूमिका वठवली होती. त्याचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांना भावला होता. तो पुन्हा एकदा खलनायक साकारण्यासाठी सज्ज झालाय. रजनीकांतच्या आगामी 'दरबार' या चित्रपटात तो क्रूर व्हिलन साकारणार आहे.
''अशा प्रकारच्या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळतेय हे माझे भाग्य आहे. हे वर्ष माझ्यासाठी आणि सान्यासाठी खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात खूप सकारात्मक ठरले आहे," असे प्रतीकने म्हटले आहे. "मी रजनीकांत सर आणि ए आर मुर्गाडोस यांच्यासोबत काम करण्यासाठी उतावीळ झालो आहे,'' असेही तो म्हणाला.
प्रतीकने यापूर्वी 'कुसेलान', 'चंद्रमुखी' आणि 'शिवाजी' या चित्रपटात रजनीकांतसोबत काम केले आहे. मुर्गाडोस यांनी गेल्या आठवड्यात दरबार तित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला होता.
-
Here We Go! #Thalaivar167 😎 is #Darbar 🌟@rajinikanth @ARMurugadoss #Nayanthara @anirudhofficial @santoshsivan @sreekar_prasad pic.twitter.com/bNoEhne6xo
— Lyca Productions (@LycaProductions) April 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Here We Go! #Thalaivar167 😎 is #Darbar 🌟@rajinikanth @ARMurugadoss #Nayanthara @anirudhofficial @santoshsivan @sreekar_prasad pic.twitter.com/bNoEhne6xo
— Lyca Productions (@LycaProductions) April 9, 2019Here We Go! #Thalaivar167 😎 is #Darbar 🌟@rajinikanth @ARMurugadoss #Nayanthara @anirudhofficial @santoshsivan @sreekar_prasad pic.twitter.com/bNoEhne6xo
— Lyca Productions (@LycaProductions) April 9, 2019
'दरबार'च्या या पोस्टरकडे नजर टाकल्यास यात थलैवा रजनीकांत अनोखा काळा गॉगल घालून हसताना दिसतोय. त्याच्या खांद्यावर आधुनिक शस्त्रास्त्रे दिसत असून पोलिसी कुत्रा आणि कॅपही दिसत आहे. त्यामुळे 'दरबार' चित्रपटात तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे का, याबद्दलची उत्सुकता ताणली आहे.
रजनीकांतचा हा 'दरबार' चित्रपट २०२० च्या पोंगलला म्हणजेच मकर संक्रातीला रिलीज होणार आहे.