ETV Bharat / sitara

'पिकासो' चित्रपटातून दिसणार कोकणातील दशावतारी कलावंताची कथा, फर्स्ट लूक प्रदर्शित - Picasso the film

तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी - नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध आहे. या लोककलेवर बेतलेला 'पिकासो' हा एकमेव चित्रपट आहे. विशेष म्हणजे त्याचे चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आले आहे.

'पिकासो' चित्रपटातून दिसणार कोकणातील दशावतारी कलावंताची कथा, फर्स्ट लूक प्रदर्शित
author img

By

Published : Sep 24, 2019, 9:21 AM IST

मुंबई - अभिनेता प्रसाद ओक लवकरच 'पिकासो' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कोकणातील दशावतारी कलावंताची कथा पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या प्रसादचा या चित्रपटातील फर्स्ट लूकदेखील प्रदर्शित झाला आहे. प्रसादची दशावतारातील मोहक छबी पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली आहे. त्याची चित्रपटातील नेमकी भूमिका कशी असणार, याबद्दलही कुतूहल निर्माण झाले आहे.

'बुटीक फिल्म स्टुडिओ'आणि 'प्लॅटून वन फिल्म्स'यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. अमराठी युवा निर्माते शिलादित्य बोरा यांची ही पहिलीच निर्मिती आहे. 'कोर्ट' या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

Prasad oak starer Picasso film first look out
'पिकासो' चित्रपटाचा फर्स्ट लूक

हेही वाचा -'मन उधाण वारा' चित्रपटात दिसणार ही नवी जोडी

या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं आहे. त्यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या '१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आणि '७व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल' करिता निवडला गेला आहे. २८ सप्टेंबर रोजी मुंबईत 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' तर २९ सप्टेंबर रोजी 'ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल', गुवाहाटी येथे या चित्रपटाचे विशेष खेळ होणार आहेत.

तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी - नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध आहे. या लोककलेवर बेतलेला 'पिकासो' हा एकमेव चित्रपट आहे. विशेष म्हणजे त्याचे चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आले आहे.

हेही वाचा -पाहा 'बिग बॉसच्या 13 पर्वातील आलिशान घराचे फोटो

या लोककलेला ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. राजाश्रय आणि सरकारी अनुदानाशिवाय ही लोककला जिवंत ठेवण्याचे कसब दशावतारी कलावंतांनी जोपासले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ३ लाख ५० हजार दशावतारी कलावंतांची उपजीविका या कलेवर असूनही सरकारने या कलावंतांच्या तसेच या लोककलेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. 'आजतागायत या दशावतारी कलेसाठी प्रचंड आर्थिक संघर्ष करून, आपले कर्तव्य समजून तिला जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या अगणित दशावतारी हयात व दिवंगत कलावंत, गायक यांना हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत" असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी सांगितलं आहे.

या चित्रपटात बाल कलाकार समय संजीव तांबे याची प्रमुख भूमिका आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा तारा, लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकने दशावतारी रंजल्यागांजलेल्या व्यसनाधीन पित्याची विलक्षण भूमिका साकारली आहे.

हेही वाचा -'बिग बॉस'मध्ये ढोल ताशाच्या गजरात सलमान खानचे झाले असे शानदार स्वागत

अलिकडेच प्रसादला त्याने दिग्दर्शित केलेल्या 'कच्चालिंबु' या चित्रपटासाठी त्यांना मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'किल्ला' चित्रपटाचे लेखक तुषार परांजपे हे 'पिकासो' साठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. या विषयी सांगताना ते म्हणतात "ही कला नेहमीच माझा उत्साह वाढवीत आली आहे. या चित्रपटात दशावतारी कलावंतांच्या दैनंदिन जीवनमान, त्यांचा अंतर्गत संघर्ष इत्यादी बाबींवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे'.

‘पिकासो’चे निर्माते शिलादित्य बोरा सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टी आज एक अत्यंत विकसित आणि अष्टपैलू कलेने समृद्ध आहे. अलिकडच्याकाळात कित्येक अत्याधुनिक, तांत्रिक सकस दर्जेदार सिनेमाची निर्मिती झाली आहे. जगभरातील समीक्षकांची प्रशंसा आणि बॉक्स ऑफिसवरील नोंदी पहाता हा मराठीचा सुवर्ण काळ आहे. आमची 'प्लॅटून वन फिल्म्स' विविध विषयांवरील इतर दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास विशेष उत्सुक आहे. हा चित्रपट या वर्षाअखेरीस प्रदर्शित करण्याचा निर्माते शैलादित्य बोरा यांचा मानस आहे.

Intro:'बुटीक फिल्म स्टुडिओ'आणि 'प्लॅटून वन फिल्म्स'यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या 'पिकासो'या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज खास प्रेक्षकांसाठी आज प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. अमराठी युवा निर्माते शिलादित्य बोरा यांची ही पहिली निर्मिती असून 'कोर्ट' या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं असून हा त्यांचा हा पहिलाच चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या '१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' व '७व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल' करिता निवडला गेला आहे. २८ सप्टेंबर रोजी मुंबईत 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' तर २९ सप्टेंबर रोजी 'ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल', गुवाहाटी येथे या चित्रपटाचे विशेष खेळ होणार आहेत.
तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी - नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध असून या लोककलेवर बेतलेला 'पिकासो' हा एकमेव चित्रपट आहे. योगायोग म्हणजे त्याचे चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आले आहे. या लोककलेला ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असून राजाश्रय व सरकारी अनुदानाशिवाय ही लोककला जिवंत ठेवण्याचे कसब दशावतारी कलावंतांनी जोपासले असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तीन लाख पन्नास हजार दशावतारी कलावंतांची उपजीविका या कलेवर असूनही सरकारने या कलावंतांच्या तसेच या लोककलेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. "आजतागायत या दशावतारी कलेसाठी प्रचंड आर्थिक संघर्ष करून, आपले कर्तव्य समजून तिला जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या अगणित दशावतारी हयात व दिवंगत कलावंत, गायक यांना हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत" असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी सांगितलं आहे.

या चित्रपटात बाल कलाकार समय संजीव तांबे याची प्रमुख भूमिका असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा तारा, लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक यांनी दशावतारी रंजल्यागांजलेल्या व्यसनाधीन पित्याची विलक्षण भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कच्चालिंबु' या चित्रपटासाठी त्यांना मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या किल्ला चित्रपटाचे लेखक तुषार परांजपे हे पिकासो साठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून त्यांचे पिकासोच्या निर्मितीत विशेष योगदान आहे.

या विषयी सांगताना ते म्हणतात "ही कला नेहमीच माझा उत्साह वाढवीत आली आहे. या चित्रपटात दशावतारी कलावंतांच्या दैनंदिन जीवनमान, त्यांचा अंतर्गत संघर्ष इत्यादी बाबींवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून स्वतःमधील सत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे."

‘प्लॅटून वन फिल्म्स’चे संस्थापक आणि ‘पिकासो’चे निर्माते शिलादित्य बोरा सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टी आज एक अत्यंत विकसित आणि अष्टपैलू कलेने समृद्ध आहे. अलिकडच्याकाळात कित्येक अत्याधुनिक, तांत्रिक सकस दर्जेदार सिनेमाची निर्मिती झाली आहे, जगभरातील समीक्षकांची प्रशंसा आणि बॉक्स ऑफिसवरील नोंदी पहाता हा मराठीचा सुवर्ण काळ आहे. आमची 'प्लॅटून वन फिल्म्स' विविध विषयांवरील इतर दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास विशेष उत्सुक आहे.

वर्ष अखेरीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माते शैलादित्य बोरा यांचा मानस आहे.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.