ETV Bharat / sitara

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये झळकणार अभिनेत्री प्रार्थना बेहेरे - prarthana behere

प्रार्थनाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
author img

By

Published : Aug 3, 2021, 7:06 AM IST

मुंबई - स्वर्गीय सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेतून हिंदी टेलिव्हिजनवर प्रार्थना बेहरेने पाऊल ठेवले. अनेक मराठी चित्रपट केल्यानंतर आता ती पुन्हा एकदा टेलिव्हिजन मालिकेत दिसणार आहे. परंतु यावेळेस प्रार्थना मराठी मालिकेत भूमिका करतेय. प्रार्थना बेहरे ११ वर्षांनी झी मराठीवर परतली आहे. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेतून प्रार्थना मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’
‘माझी तुझी रेशीमगाठ’
प्रार्थनाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमावरही प्रार्थना बरीच ऍक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु, गेली दोन वर्ष प्रार्थना मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटताना आनंद होत असल्याचं प्रार्थना म्हणते. जशी तिच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे तशीच प्रार्थनाही तिच्या चाहत्यांना मालिकेतून भेटण्यास उत्सुक आहे. मराठी मालिकेमध्ये पदार्पण करण्याबद्दल प्रार्थना म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं.’प्रार्थना पुढे म्हणाली, "आता जवळपास दोन वर्ष माझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मला चाहते वारंवार एकच प्रश्न विचारताय की प्रार्थना मॅम तुमचा पुढचा चित्रपट कधी येणार. त्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी कुठे गायब आहे, असं चाहते मला विचारायचे. यावरून मला एक कळलं की चाहते आपल्याला पाहायला उत्सुक आहेत. परंतु, मी अनेक वर्षांनंतर मालिका करत आहे त्यामुळे दिग्दर्शकांना मी मला नवीन कलाकाराप्रमाणे वागणूक देण्यासाठी बजावलं आहे कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत." ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थनासोबत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतून श्रेयसदेखील जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका २३ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, झी मराठीवर.

हेही वाचा - आमिर खान तसेच किरण रावने घेतली जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.