मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाई ‘सायलेन्स कॅन यू हियर इट’ या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही व्यक्तीरेखा मजबूत असल्याचे ती म्हणाली.
"जिथे एक खून आहे तेथे एक तपास अधिकारी आहेत आणि या खून रहस्यात मी सहभागी होत आहे. यात माझी इन्स्पेक्टर संजना ही व्यक्तिरेखा असून ती सहजपणे माघार घेऊ शकत नाही. ती बळकट आणि कल्पक आहे आणि ती सर्व समर्पीत पोलीस अधिकारी आहे," असे आपल्या भूमिकेबद्दल प्राची म्हणाली.
"ती तरूण असूनही, ती खूप प्रोफेशनल आहे. ती मनोज बाजपेयी साकारत असलेल्या एसीपी अविनाश वर्मा यांच्या केसबद्दल समर्पण देण्याच्या वृत्तीने प्रभावित झालेली आहे. तिला त्यांच्यासारखे बनायचे आहे. प्रेक्षकांनी मला अशा भूमिकेत कधीच पाहिलेले नाही. या चित्रपटातील भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यास ती उत्सुक आहे.'', असंही ती म्हणाली.
या चित्रपटात अर्जुन माथुर आणि साहिल वैददेखील आहेत आणि मार्च 2021 मध्ये झी 5 वर रिलीज होणार आहेत. चित्रपट एका महिलेच्या रहस्यमय गायब होण्याची कहाणी आहे.
हेही वाचा - कंगनासोबत वादग्रस्त ई-मेल प्रकरणी हृतिक रोशनची होणार चौकशी