हैदराबाद: कोविडच्या दुसर्या जबरदस्त लाटेमुळे महाराष्ट्र सरकारने सर्व चित्रपट आणि टीव्ही शूट थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक बिग बजेट चित्रपटांचे शूटिंग रखडले आहे. अभिनेता प्रभासच्या आदिरुरुष चित्रपटाचे शुटिंग मुंबईत सुरू होते. महाराष्ट्रात शुटिंगसाठी निर्बंध आल्यामुळे निर्मात्यांनी हे शुटिंग हैदराबादमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील महिन्यात सिनेमा हॉल पुन्हा बंद झाले आणि चित्रपट व टीव्ही मालिकांमधील प्रॉडक्शनदेखील रखडली आहेत. या लॉकडाउनने बॉलिवूडला मोठा अडथळा आणला आहे. शाहरुख खानचा आगामी चित्रपट पठाण, रणवीर सिंग-स्टारर सर्कस, प्रभासचा आदिपुरुष, अजय देवगणचा मायडे आणि मैदान या चित्रपटांसह अनेक मोठ्या चित्रपटांची शूटिंग महाराष्ट्र राज्यात झाली आहेत. या चित्रपटांव्यतिरिक्त, निर्मितीच्या विविध टप्प्यावर इतर असंख्य चित्रपटांचे मोठे सेट्स महाराष्ट्रात व मुंबईत उभे आहेत. मात्र लाकडाऊनमुळे ही शुटिंग थांबली आहेत.
ताज्या अहवालानुसार, आदिपुरुषांचे निर्माते या चित्रपटाची निर्मिती महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या विचारात आहेत. आदिपुरुष टीमने मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये जवळपास दोन महिने शूटिंग केले आहे आणि मार्चमध्ये ब्रेकनंतर त्यांच्या पुढील शेड्यूलची सुरुवात होणार आहे. चित्रपटाचे काम संपायला सुमारे ९० दिवस अजून लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आदिपुरुषचे उर्वरित शुटिंग हैदराबादमध्ये करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय.
या चित्रपटात प्रभास आदिपुरुषची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत, तर सैफ मुख्य खलनायक लंकेशच्या भूमिकेत अवतरणार आहे. ज्याला निर्मात्यांनी यापूर्वी “जगातील सर्वात बुद्धिमान राक्षस” म्हणून संबोधले होते.
थ्रीडी फीचर फिल्म असलेला हा चित्रपट भारतीय महाकाव्याचे रूपांतर आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी आणि तेलगूमध्ये केले जाईल आणि तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतर अनेक विदेशी भाषांमध्ये या चित्रपटाचे डबिंग केले जाईल.
भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर निर्मित हा चित्रपट २०२२ मध्ये मोठ्या पडद्यावर उतरणार आहे.
हेही वाचा - ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन