ETV Bharat / sitara

ठरलं! 'या' दिवशी होणार 'साहो' प्रदर्शित; पाहा प्रभासचा नवा लूक - release date

'साहो'च्या टीजरनंतर चाहत्यांना ट्रेलरची आस लागलेली आहे. प्रभासचा दमदार लूक आणि अॅक्शन पाहून 'साहो' चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याचीही उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

ठरलं! 'या' दिवशी होणार 'साहो' प्रदर्शित; पाहा प्रभासचा नवा लूक
author img

By

Published : May 21, 2019, 1:04 PM IST

मुंबई - 'बाहुबली' स्टार प्रभासच्या 'साहो' चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून आतुरता आहे. 'साहो'च्या टीजरनंतर चाहत्यांना ट्रेलरची आस लागलेली आहे. प्रभासचा दमदार लूक आणि अॅक्शन पाहून 'साहो' चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याचीही उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करून प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे. साहो'मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे़. हा चित्रपट तेलुगू, तामिळ आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Prabhas new look
पाहा प्रभासचा नवा लूक

'साहो' चित्रपटाचे सुजीत दिग्दर्शक असून भूषण कुमार यांची टी सीरीज आणि यूवी क्रिएशन प्रॉडक्शन प्रस्तुत करते आहेत. तर, वामसी, प्रमोद अणि विक्रम चित्रपटाचे निर्माते आहे. हा चित्रपट देशात आणि देशाबाहेर चित्रित केला जात आहे. तर चित्रपटात बहु-प्रतिभाशाली अमिताभ भट्टाचार्य यांच्या लिरिक्स आणि शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत असेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.