हैदराबाद - तेलुगू सुपरस्टार प्रभासने शुक्रवारी आपल्या आगामी 'राधेश्याम' चित्रपटाचे एक नवीन पोस्टर आपल्या चाहत्यांसाठी प्रसिद्ध केले असून यामुळे त्याचे चाहते उत्साही दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्टर जारी करताना प्रभासने लिहिले, "माझ्या सर्व प्रिय चाहत्यांना. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. राधेश्याम, २०२१ "
या चित्रपटात प्रभास अभिनेत्री पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
राधेश्याम हा पिरियॉडिक रोमँटिक-नाट्यमय चित्रपट आहे. या बहुभाषिक चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.
हेही वाचा - नवीन वर्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही - मनोज बाजपेयी