मुंबई - अभिनेत्री पूजा सावंतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तिला आनंदाचे भरते आल्याचे दिसते. तिला झालेला हा आनंद एका एका मुक्या जखमी पक्षाला वाचवल्याचा तर आहेच पण त्याहून जास्त म्हणजे त्याला पुन्हा भरारी घेताना, त्याच्या मूळ निसर्ग सहवासात परतण्याचा आहे.

पूजा सावंतच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक घुबड दिसते. पाण्याच्या शोधात आलेले हे घुबड एका पाण्याच्या टाकीमध्ये अडकले होते. पूजाच्या ओळखीच्या लोकांनी तिच्याशी संपर्क साधला आणि या जखमी, अशक्त घुबडाबद्दल सांगितले. पूजाने त्या घुबडावर प्रथोमोपचार केले आणि डॉक्टरांकडे घेऊन गेली. तिच्या ओळखीच्या डॉक्टरांनी घुबडावर योग्य उपचार केले आणि अखेर घुबडाच्या पंखात उडण्या इतपत बळ आले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - पदार्पणच्या सिनेमात शनाया कपूरचा गुरफाते पीरजादा आणि लक्ष्या लालवाणीसोबत प्रेमाचा त्रिकोन
घुबड बरे झाल्याचा तिला आनंद तर होताच पण आता तिला या पाहुण्याचा निरोप घ्यायचा होता. मुंबई फिल्म सिटीमध्ये शुटिंग करीत असताना पूजाने स्टुडिओच्या मागे असलेल्या जंगलाच्या दिशेने या घुबडाला सोडून दिले. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अलौकिक होता.