ETV Bharat / sitara

पूजा सावंत म्हणतेय गश्मीर महाजनीला, 'लव्ह यू मित्रा'! - ‘लव्ह यू मित्रा’ मोशन पोस्टर

पूजा सावंत आणि गश्मिर महाजनी हे ‘बोनस’ नंतर पुन्हा ‘लव्ह यू मित्रा’ साठी एकत्र येत आहेत व त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी मराठी रसिकजन उत्सुक आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

Pooja Sawant and Gashmir Mahajani
पूजा सावंत आणि गश्मिर महाजनी
author img

By

Published : Feb 15, 2021, 3:28 PM IST

व्हॅलेंटाईन डे फक्त प्रियकर-प्रेयसी यांच्यासाठी नसून प्रत्येक व्यक्ती जिचा प्रेमावर विश्वास आहे तिच्यासाठी पण आहे. प्रेम... प्यार... लव्ह... इष्क... भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद आहे. प्रेमाची खासियत म्हणजे प्रेम हे बांधून ठेवणारं नसून ते मुक्त करणारं असतं. प्रेम हे फक्त जोडीदारावरच असतं असं नाही तर कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांवरही असू शकतं. खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. तरीही अनेक जण आपल्या प्रेमभावना 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. याच खास दिनाचे औचित्य साधून 'मिनी फिल्म्स' घेऊन येत आहे 'लव्ह यू मित्रा'.

‘लव्ह यू मित्रा’ मोशन पोस्टर
चित्रपटाचे निर्माता वरुण बागला त्यांच्या अनुभवाबद्दल सांगतात, ''निर्मिती क्षेत्रातील हा माझा पहिला चित्रपट असला तरी माझी संपूर्ण टीम अनुभवी आहे. चित्रपटात पूजा सावंत, गश्मीर महाजनी यांच्यासह एम-टाऊनमधील कसलेल्या कलाकारांचा सहभाग आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच सुखद अनुभव आहे आणि चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर 'लव्ह यू मित्रा' हा प्रेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा सिनेमा आहे. आजच्या तरुणाईला आवडेल आणि एकविसाव्या शतकातील पुरोगामी आणि प्रयोगशील पिढीला आपलासा वाटेल, असा विषय आणि विचार मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.''
‘Love You Friend’ Poster
‘लव्ह यू मित्रा’ पोस्टर
हा चित्रपट आजच्या तरुणाईला भावणारा, मनोरंजक आणि नवीन विचार मांडणारा असा आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मानसी बागला असून सिद्धार्थ साळवी यांनी लेखन केले आहे. 'लव्ह यू मित्रा'मध्ये पूजा सावंत, गश्मीर महाजनी हे प्रमुख भूमिकेत असून आणखी एका कलाकारचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. "अशा प्रकारचा विषय मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच हाताळण्यात आला आहे, हा सिनेमा आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत नक्कीच पाहू शकता'', अशी प्रतिकिया चित्रपटाच्या दिग्दर्शिका मानसी बागला यांनी दिली. दिग्दर्शकीय पदार्पणासाठी पूजानेही मानसी बागला यांना शुभेच्छा दिल्या असून या चित्रपटाची ती आतुरतेने वाट बघत असल्याचेही तिने सांगितले. तर गश्मीर म्हणतो,'' ही स्क्रिप्ट वाचतानाच माझ्या मनाला खूप भावली. त्यात एक वेगळेपण आहे. चित्रपटाचा आशय अतिशय प्रगल्भ आहे. मिनी फिल्म आणि संपूर्ण टीमला माझ्या खूप शुभेच्छा!'' पूजा सावंत आणि गश्मिर महाजनी हे ‘बोनस’ नंतर पुन्हा ‘लव्ह यू मित्रा’ साठी एकत्र येत आहेत व त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी मराठी रसिकजन उत्सुक आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

हेही वाचा - 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त अमृता फडणवीसांचं ‘ये नयन डरे डरे’ प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.