मुंबई - अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच आई बनणार आहे. अलिकडेच तिच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी खास पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होते. तिच्या बेबी शॉवरचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एमीने काही महिन्यांपूर्वीच ती गरोदर असल्याची माहिती दिली होती.
आता लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे.
तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर करुन तिने खास कॅप्शनही दिलं आहे.
'माझ्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी आणि नातेवाईकांनी माझ्या बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं. माझं येणारं बाळ खूप नशीबवान आहे की त्याला इतकं प्रेम देणारे नातलग मिळाले आहे', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
एमीने तिचे बेबी बंपसोबतचे बरेचसे फोटो यापूर्वीही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिचा बॉयफ्रेन्ड जॉर्ज हा ब्रिटीश राजकुमार आहे. लवकरच ते दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी त्यांचा साखरपुडा आटोपला.