नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीच्या स्थितीबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप मौन धारण केले आहे या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. विनीत ढांडा यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एजन्सीला तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत व यासंदर्भात अहवाल सादर करावा, असे आवाहन केले आहे.
या याचिकेत म्हटले आहे की सुमारे चार महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
सुशांत १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.
हेही वाचा - एकता कपूर १०० प्रेरणादायी लीडर्सच्या यादीत समाविष्ठ
या याचिकेत म्हटले आहे की, "सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या प्रमुख तपास यंत्रणेवर गंभीर आत्मविश्वास व्यक्त केला आणि दिवंगत अभिनेत्याच्या अनैसर्गिक मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देश दिले. कारण त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश आणि अगदी परदेशी हादरले होते. राजपूत यांच्या अनैसर्गिक मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला होता. "
याचिकेत नमूद केले आहे की या कोर्टाने १९ ऑगस्ट २०२० रोजी सीबीआय चौकशीचा आदेश मंजूर केला आणि आता जवळपास चार महिने उलटून गेले तरी सीबीआयने त्याचा तपास निष्कर्ष काढलेला नाही. त्यात सुशांतच्या मृत्यूच्या बाबतीत, त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह तसेच त्याचे चाहते आणि हितचिंतकही अद्याप त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधू शकलेले नाहीत.
हेही वाचा - राजामौलींच्या बहुचर्चित 'आरआरआर' चित्रपटाच्या सेटवर आलिया भट्ट झाली दाखल
या चौकशीसाठी कोर्टाने आता दोन महिन्यांची मुदत द्यावी, जेणेकरून वेळेवर निष्कर्ष निघू शकेल. याबरोबरच सीबीआयला त्याच्या तपासासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून मागितले आहेत.
"सध्याच्या प्रकरणात सीबीआय जबाबदारीने काम करीत नाही आणि या प्रकरणातील चौकशीला उशीर होत आहे," असं याचिकेत म्हटलं आहे.