२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘क्लासमेट्स’ आणि ‘बॉइज’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकत्याच हंपीला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री पल्लवी पाटील म्हणते, “जगातल्या सर्वोत्तम स्थळांमधलं एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हंपीची गणना केली जाते. मी आर्किटेक असल्याने या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट देण्याची इच्छा मला कॉलेजमध्ये असल्यापासून होती. पण ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली.”

पल्लवी हंपीच्या आठवणी जागवताना म्हणते, “तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेली सुंदर शिल्पं, मंदिरे पाहताना, त्यांच्यावर केलेलं कोरीव काम बघताना आपल्या प्राचीन संस्कृतीची, कलासौन्दार्याची प्रचीती येते. हंपीमध्ये भटकंती करताना प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा असलेल्या या हंपीच्या सौंदर्याच्या आपण प्रेमात पडतो.”

पल्लवी सांगते, “मला कोणत्याही शहराला भेट दिल्यावर तिथल्या लोकांविषयी जाणून घ्यायला आवडते. त्यामुळेच मी हंपीला दिलेल्या भेटीत हॉटेलवर न राहता, एक होम-स्टे केला होता. तिथल्या रिक्षावाल्या मामांपासून ते ज्यांच्या घरी आम्ही राहिलो होतो, त्या काकूंपर्यंत सगळ्यांशी खास नाते निर्माण झाले. आणि म्हणूनच कदाचित हंपीची टूर एक मेमोरेबल ट्रिप ठरली.”