मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून 'पद्म' पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये १४१ 'पद्म' पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ७ 'पद्म विभूषण', १६ 'पद्म भूषण' आणि ११८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापैकी बॉलिवूडच्या काही कलाकारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या नावाचाही समावेश आहे.
करण जोहरला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो भावुक झालेला दिसला. त्याने ट्विटरवरुन सर्वांचे धन्यवाद मानले. तसेच आपल्या वडिलांसाठीही त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहलेय, की 'असं खूप कमी वेळा होतं की मी भावनांना शब्दात व्यक्त करु शकत नाही. हा देखील असाच क्षण आहे. 'पद्मश्री'. देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला हा सन्मान मिळत असल्याने आज फार अभिमान वाटत आहे'.
'माझ्या वडिलांनाही या क्षणाचा फार अभिमान वाटला असता. हा क्षण साजरा करण्यासाठी ते माझ्यासोबत आज असायला हवे होते', असे करणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करण जोहर हा बॉलिवूडचे दिग्गज निर्माता यश जोहर यांचा मुलगा आहे. करणने १९९८ साली 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शनिय करिअरला सुरुवात केली. करणच्या या पहिल्याच चित्रपटाने पडद्यावर कमाल दाखवली होती.
या चित्रपटानंतर त्याने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इझ खान', 'स्टूडंट ऑफ द ईयर', 'ऐ दिल है मुश्किल' यांसारखे बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तसेच निर्मिती क्षेत्रातही त्याने बरेच यश मिळवले आहे. आज करण जोहर बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता मानला जातो.
- View this post on Instagram
Dots and commas ! #christmasspirit styled by @nikitajaisinghani in @nikhilthampi 📷 @rahuljhangiani
">