ETV Bharat / sitara

अभिमानास्पद, प्रियंका चोप्राने निकसोबत केली ऑस्कर नामांकनाची घोषणा - अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर

प्रियंका चोप्रा जोनास आणि तिचा नवरा निक यांनी ९३ व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली. ही घोषणा करताना हे जोडपे खूप उत्साही होते कारण प्रियंकाची भूमिका असलेल्या द व्हाईट टायगर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रुपांतरित स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन देण्यात आले आहे.

Oscars 2021
ऑस्कर २०२१
author img

By

Published : Mar 16, 2021, 1:23 PM IST

Updated : Mar 16, 2021, 1:56 PM IST

हैदराबाद - ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनास हिने सोमवारी संध्याकाळी तिचा नवरा निक जोनास याच्यासोबत ऑस्कर २०२१ च्या नामांकनाची घोषणा केली. हे जोडपे खूप उत्साही होते कारण प्रियंकाची भूमिका असलेल्या 'द व्हाईट टायगर' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रुपांतरित स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन देण्यात आले आहे.

ऑस्कर नामांकनाची घोषणा केल्यानतंर निक जोनासने पत्नी प्रियंकासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिलंय, ''ऑस्कर नामांकनाची घोषणा करण्याची संधी मला एका सुंदर स्त्रीसोबत मिळाली, जिने ऑस्कर नामांकित चित्रपट (द व्हाईट टायगर) निर्माण केला. नामांकने मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन. मी २५ एप्रिल रोजी पहाार आहे.''

ऑस्कर २०२१च्या नामांकनाची घोषणा

प्रियंकाने निकच्या प्रेमास प्रतिसाद देण्यासाठी फार वेळ वाया घालवला नाही आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तिने "❤️ माय फोरएव्हर गाय ", असे लिहिले.

प्रियंका चोप्राने ट्विटरवर नामांकनाच्या तक्त्याचा स्क्रिन शॉट शेअर केलाय ज्यात 'व्हाईट टायगर'ला नामांकित झालेल्यांपैकी एक दाखविण्यात आले आहे.

पोस्टवर कॅप्शनमध्ये तिची मनातील भावना व्यक्त करताना प्रियांका चोप्राने लिहिले की, "आम्ही नुकतेच ऑस्करसाठी नामांकन झालो! रामिन आणि टीम # द व्हाईट टायगरचे अभिनंदन. असं असलं तरी मी स्वत: नामनिर्देशन घोषित केल्यामुळे ते खूपच खास बनलं. खूप गर्व वाटतो."

कोरोनाव्हायरसच्या धोक्यामुळे प्रियंकाने ऑस्कर नामांकनाची घोषणा आपल्या घरातूनच केली. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिने शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोत प्रियंकाने हातात एक विशाल ऑस्कर अवॉर्ड आकाराचा पुतळा पकडला असून तो खाली टेकू नये यासाठी निक उचलून धरताना दिसत आहे. या फोटोवर भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत.

दुसर्‍या फोटोत प्रियंका निकबरोबर पोज देत आहे. 'इज नॉट इट रोमँटिक' स्टार प्रियंकाने निळा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. तर 'सकर' गायक निक जोनास पिवळ्या रंगाच्या टक्सिडो आणि पांढरा शर्ट परिधान केलेला दिसत आहे.

राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्यासह चित्रपटाच्या अन्य स्टार्सनीदेखील प्रियंकाची नामांकन पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा - ग्रॅमी अवॉर्ड्सच्या ६३ व्या पुरस्कार सोहळ्यात बियॉन्से ठरली सर्वाधिक मानांकित महिला कलाकार

Last Updated : Mar 16, 2021, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.