ETV Bharat / sitara

...म्हणून रणवीर म्हणतोय 'नही बनना स्लमडॉग मिलियनेअर', पाहा व्हडिओ! - azadi

अभिनेता रणवीर सिंग लवकरच 'गली बॉय' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातलं नवं रॅप प्रदर्शित करण्यात आले आहे.

रणवीर सिंग
author img

By

Published : Feb 12, 2019, 3:05 PM IST

मुंबई - अभिनेता रणवीर सिंग लवकरच 'गली बॉय' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अपना टाईम आयेगा' म्हणत रणवीरने प्रेक्षकांमध्ये आधीच या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. त्याच्या फर्स्ट लूकपासून तर डायलॉग्सपर्यंत या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटातलं नवं रॅप प्रदर्शित करण्यात आले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
undefined

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील गरीब आणि श्रीमंतीतील दरीचं वास्तव दाखविणारं 'दुरी' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता अशाच आशयावर 'आजादी' हे नवं रॅप प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यातही गरीबीचं वास्तव दाखविण्यात आले आहे. कल्की कोचलीन, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यावर ते चित्रीत करण्यात आलं आहे.

या गाण्यातून भ्रष्ट यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उमटविण्यात आले आहेत. त्यामुळे देशात वाढत चाललेल्या भ्रष्टाचारावर या गाण्यातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. अनेक स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणाची परिस्थितीमुळे कशाप्रकारे घुसमट होते, हे या गाण्यातून दाखविण्यात आले आहे.

'अपना टाईम आयेगा'ची जशी क्रेझ चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे आता आजादी या गाण्यातून पुन्हा एकदा रणवीरच्या दमदार अभिनयाची झलक दिसली आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'गली बॉय' चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. तर निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची परिस्थिती, रणवीरचा संघर्ष, परिस्थितीमुळे सहन करावे लागणारे धक्के आणि यातून रॅप साँगपर्यंतचा त्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

Intro:Body:

...म्हणून रणवीर म्हणतोय 'नही बनना स्लमडॉग मिलियनेअर', पाहा व्हडिओ!

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.