मुंबई - होणार.. होणार.. असं म्हणत असताना अखेर अभिनेत्री नेहा पेंडसेचा विवाहसोहळा पुण्यात मोठ्या थाटात पार पडला. पूर्वाश्रमीची नेहा पेंडसे आता नेहा शार्दूल सिंग बियास बनली आहे. फारच मोजक्या मित्र मैत्रिणी आणि आप्तेष्टांच्या साक्षीने या दोघांनी लग्नगाठ बांधली.
गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि शार्दूल यांच्या लग्नाची मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत चर्चा होती. नेहा साधारण वर्षभरापूर्वी दुबईस्थित बिजनेसमन शार्दूल बियासच्या प्रेमात पडली होती. तेव्हापासून ती प्रत्यक्ष लग्न कधी करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती.
हेही वाचा -'असा' घडला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', काजोलने शेअर केला मेकिंग व्हिडिओ
नेहाने लग्नासाठी पुणे हे ठिकाण निवडले होते. नेहाने संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या लग्नाच्या फोटोंची चाहत्यांना आतुरता होती. एवढंच काय तर सरत्या वर्षाला निरोप देताना नेहा आणि शार्दूल यांनी सरत्या वर्षाला निरोप देऊन एकमेकांना किस करतानाचा फोटो शेअर केला होता. हा फोटो देखील सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.
हेही वाचा -नेहा पेंडसेची लगीनघाई, पाहा संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो
पंजाबी स्टाईलने थेट संगीत सेरीमनी झाल्यानंतर आज पारंपरिक पद्धतीने आधी साखरपुडा आणि त्यानंतर लग्न असे दोन्ही सोहळे पार पडले. या लग्नसोहळ्याला नेहाचे इंडस्ट्रीमधील श्रुती मराठे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, अभिजित खांडकेकर असे मोजकेच मित्र मैत्रिणी हजर होते. या सगळ्यांनी दोघांच्या लग्नाचे बरेचसे फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. एकूणच मुंबईची मराठमोळी नेहा ही आता दुबईच्या पंजाबी कुटुंबाची सून झाली आहे.