मुंबई - बॉलिवूड कलाकार आपल्या चित्रपटातील भूमिकेसाठी आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. आपली भूमिका अधिकाधिक उत्तम व्हावी त्यासाठी आपल्या लूकसाठी ते बरीच मेहनत घेत असतात. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची 'बधाई हो' चित्रपटानंतर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता वाढली आहे. अलिकडेच त्यांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्यांचा प्रोस्थेटिक्स लूक तयार करण्यात आला आहे. यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हा प्रयोग करण्यात आला आहे.
नीना गुप्ते यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांना ओळखता येणंही कठिण होत आहे. मात्र, त्यांची ही मेहनत पाहून बॉलिवूडच्या इतर कलाकारांनी त्यांची प्रशंसा केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'बकाल' चित्रपटासाठी संगीतकार अशोक पत्की यांचा नवीन संगीत प्रयोग
नीना यांचा हा लूक नेमका कोणत्या चित्रपटासाठी असणार आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. नीना यांचे 'बधाई हो' चित्रपटातील सहकलाकार गजेंद्र राव यांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट करुन त्यांच्या या मेहनतीचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा -'सूर नवा ध्यास नवा': तीन पिढ्यांना एका सुत्रात गुंफण्याचं आव्हान कायम - स्पृहा जोशी