मुंबई - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आगामी 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी झळकणार आहे. या चित्रपटात दोघांच्याही लग्नाची हटके गोष्ट पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे.
फर्स्ट लूक पोस्टरमध्ये नवाजुद्दीन आणि अथियाचा लग्नातील लूक पाहायला मिळतो. विदेशात जाण्यासाठी आतुर असलेली अथिया आणि लग्नासाठी उताविळ झालेल्या नवाजुद्दीनची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
-
Nawazuddin Siddiqui and Athiya Shetty... First look poster of #MotichoorChaknachoor... Directed by Debamitra Biswal... Viacom18 Studios presentation... 15 Nov 2019 release. pic.twitter.com/XQxwRO4Khp
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Nawazuddin Siddiqui and Athiya Shetty... First look poster of #MotichoorChaknachoor... Directed by Debamitra Biswal... Viacom18 Studios presentation... 15 Nov 2019 release. pic.twitter.com/XQxwRO4Khp
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2019Nawazuddin Siddiqui and Athiya Shetty... First look poster of #MotichoorChaknachoor... Directed by Debamitra Biswal... Viacom18 Studios presentation... 15 Nov 2019 release. pic.twitter.com/XQxwRO4Khp
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2019
हेही वाचा - वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नवाजुद्दीन - अथियाच्या 'मोतीचूर चकनाचूर'चा ट्रेलर प्रदर्शित
असा आहे ट्रेलर -
अथिया शेट्टीला विदेशात जायचं असतं. याच कारणासाठी ती नवाजुद्दीनसोबत लग्न करते. मात्र, लग्नानंतर तिला कळंत, की त्याला लग्नानंतरच नोकरी लागली आहे. तिला ही गोष्ट समजल्यानतंर काय काय प्रसंग घडतात, त्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
-
Myself Pushpinder... Le de ke ek maudi mil toh gayi, par ab kya hoga? 😥 #MotichoorChaknachoor trailer out now! https://t.co/fnfWHotnT0@theathiyashetty @MotichoorMovie @viacom18studios @woodpeckermv @AndhareAjit #RajeshBhatia #KiranBhatia @ZeeMusicCompany
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Myself Pushpinder... Le de ke ek maudi mil toh gayi, par ab kya hoga? 😥 #MotichoorChaknachoor trailer out now! https://t.co/fnfWHotnT0@theathiyashetty @MotichoorMovie @viacom18studios @woodpeckermv @AndhareAjit #RajeshBhatia #KiranBhatia @ZeeMusicCompany
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) October 11, 2019Myself Pushpinder... Le de ke ek maudi mil toh gayi, par ab kya hoga? 😥 #MotichoorChaknachoor trailer out now! https://t.co/fnfWHotnT0@theathiyashetty @MotichoorMovie @viacom18studios @woodpeckermv @AndhareAjit #RajeshBhatia #KiranBhatia @ZeeMusicCompany
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) October 11, 2019
देबामित्रा बिसवाल हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, व्हायाकॉम १८ स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे.
हेही वाचा - 'द स्काय ईज पिंक': 'देसी गर्ल'चं दमदार कमबॅक, चित्रपटाच्या कमाईची गती मात्र संथ