ETV Bharat / sitara

वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित चित्रपट ‘झॉलीवूड’! - Zadipatti film ‘Jollywood’

आता एक चित्रपटही येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘झॉलीवूड’, जो वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित आहे. झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटाची कथा आसावरी नायडू, पटकथा तृषांत इंगळे, योगेश राजगुरू यांनी छायांकन वैभव दाभाडे यांनी संकलनाची जवाबदारी सांभाळली आहे.

zadipatti
‘झॉलीवूड’ पोस्टर
author img

By

Published : Mar 13, 2021, 8:09 PM IST

हॉलिवूड ही अमेरिकेतील लॉस अँजेलिस शहरातील एक भाग असून तिथे बहुसंख्य सिनेमाशी निगडित लोकं राहतात व अनेक चित्रपट निर्मित होतात. हिंदी चित्रपटसृष्टीवर पूर्वी हॉलिवूड चा पगडा होता म्हणून कोणीतरी या सिनेसृष्टीला, जी ‘बॉम्बे’ मध्ये होती, बॉलिवूड म्हणून संबोधित करू लागलं व हे नाव आजतागायत हिंदी चित्रपटसृष्टीला चिकटले आहे. ते नाव तसं आकर्षक असल्यामुळे टॉलिवूड, कॉलिवूड, मॉलीवूड सारखी नाव प्रादेशिक चित्रपटसृष्टींनीं ल्यायली. आता एक चित्रपटही येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘झॉलीवूड’, जो वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित आहे.

zadipatti
‘झॉलीवूड’ पोस्टर
विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटाची कथा आसावरी नायडू, पटकथा तृषांत इंगळे, योगेश राजगुरू यांनी छायांकन वैभव दाभाडे यांनी संकलनाची जवाबदारी सांभाळली आहे. विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित "झॉलीवूड" हा चित्रपट येत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. हा चित्रपट तृषांत इंगळे दिग्दर्शित करीत आहेत ज्यांनी स्वतः झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या विचाराने तृषांतनं वयाच्या १६व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता 'झॉलीवूड" या चित्रपटाच्या रुपानं त्यानं पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मासूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. "न्यूटन", "सुलेमानी किडा" असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर देखील आहेत. हेही वाचा - यावर्षीची अमरनाथ यात्रा 28 जूनपासून होणार सुरू, श्राइन बोर्डाच्या बैठकीत निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.