ETV Bharat / sitara

'दृष्यम २' चा टीझर रिलीज, ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रीमियर - 'दृष्यम २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या रिलीजची घोषणा

'दृष्यम' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल 'दृष्यम २' चा टीझर रिलीज झाला आहे. मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करीत असून या वर्षी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

''Drishyam 2'
'दृष्यम २' चा टीझर रिलीज
author img

By

Published : Jan 2, 2021, 11:51 AM IST

मुंबई - दिग्गज अभिनेता मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या 'दृष्यम २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या रिलीजची घोषणा झाली आहे. जितू जोसेफ दिग्दर्शत हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

'दृष्यम २' चा टीझर शुक्रवारी रिलीज करण्यात आला असून अमेझॉन प्राईम व्हिडिवर हा चित्रपट यावर्षी झळकेल.

मोहनलाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ''जॉर्जेकुट्टी कुटुंबीय लवकरच भेटीला येत आहे. 'दृष्यम २' प्राईम व्हिडिओवर २०२१ मध्ये या वर्षी रिलीज होईल. हॅप्पी न्यू इयर २०२१. दृष्यमचा टीझर रिलीज झाला आहे.''

'दृष्यम २ चे' शुटिंग कोची आणि थोडुपुझा येथे पार पडले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी सांगितले की, ''चित्रपटाचे निर्माते अँथोनी पेरुंबावूर यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचे ठरवले आहे. या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग लाभण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल.''

हेही वाचा - २०२० विचित्र होते, २०२१ साठी कोणताही संकल्प नाही - अमिताभ बच्चन

एका रात्री अचानक ओढवलेल्या संकटावर जॉर्जेकुट्टी ( मोहनलाल) आणि त्यांचे कुटुंबीय कसे मात करतात या विषयावरील हा चित्रपट आहे.

हेही वाचा - प्रभासने चाहत्यांना दिली नव वर्षाची भेट, 'राधेश्याम'चे नवे पोस्टर जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.