मुंबई - प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. याचाच प्रत्यय 'सिनिअर सिटीझन' या चित्रपटातील 'रुसवा फुगवा' हे रोमॅन्टिक गाण्यातून येतो. मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातून त्यांच्यातील प्रेम, एकमेकांविषयी असलेली ओढ सहज जाणवते. उतारवायतही खुलणारे हे प्रेम तरुणांनाही प्रेरित करणारे असे आहे.
मोहन जोशी यांचा आगामी 'सिनिअर सिटीझन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटातील रुसवा - फुगवा हे गाणं अलिकडेच प्रदर्शित करण्यात आलं आहे. आपल्या रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी मोहन जोशी यांचे सुरू असलेले प्रयत्न आणि त्यांच्यातील गोड, अतूट नाते आपल्याला या गाण्यातून दिसते.
या रोमँटिक गाण्याचे संगीतकार अभिजित नार्वेकर आहेत. तर, अंबरीश देशपांडे यांनी हे गाणे लिहिले असून विनय मांडके यांनी गायले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या चित्रपटात स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या चित्रपटात दिसणार आहेत. येत्या १३ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित 'सिनियर सिटीझन' या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी तर एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर म्हणून प्रमोद सुरेश मोहिते यांनी काम पहिले आहे.