ETV Bharat / sitara

इटलीतील फ्लॉरेन्स येथील ‘ला कोंपांगी’ सिनेमागृहात 'मीडियम स्पाइसी' चे प्रदर्शन! - नॉर्वे बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल

नॉर्वे बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल आणि दलास/फोर्ट वर्थ साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ च्या २१ व्या आवृत्तीसाठी मराठमोळ्या ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची निवड करण्यात आली आहे.

Medium spicy
‘ला कोंपांगी’ सिनेमागृहात 'मीडियम स्पाइसी' चे प्रदर्शन!
author img

By

Published : Nov 11, 2021, 9:01 PM IST

मुंबई - मोहित टाकळकर दिग्दर्शित, ‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा आहे. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, तसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Medium spicy
‘ला कोंपांगी’ सिनेमागृहात 'मीडियम स्पाइसी' चे प्रदर्शन!
नॉर्वे बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल आणि दलास/फोर्ट वर्थ साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ च्या २१ व्या आवृत्तीसाठी मराठमोळ्या ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची निवड करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाने या फिल्म फेस्टिव्हलची सांगता होईल. अमिताभ बच्चन, अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तापसी पन्नू यासारख्या नामवंत कलाकार ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या यात सहभागी झाले होते.‘ला कोंपांगी’ मध्ये होणार प्रदर्शन ‘मीडियम स्पाइसी’ ८ डिसेंबर रोजी इटलीमधील, फ्लॉरेन्स येथील ‘ला कोंपांगी’ या आकर्षक सिनेमागृहात थेट ऑन-ग्राउंड दाखवला जाईल. संपूर्ण इटलीमध्ये चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ते एकाच वेळी ऑन-लाइन सुद्धा उपलब्ध असेल. विधि आणि मोहित हे दोघेही डिजिटल मीटसाठी उपस्थित राहतील.हेही वाचा - नागराज मंजुळे यांचा ‘जयंती’ चित्रपटाला पाठिंबा; जयंती होतोय आज प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.