मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे चित्रपटसृष्टीला एक प्रकारे कळा आली होती. शुटिंग थांबली, रिलीज रोखण्यात आले, थिएटर्सवर अनेक निर्बंध यामुळे मराठी सिनेमाला वाईट दिवस आले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर थिएटर्स काही अटी शर्थीवर पुन्हा उघडली आणि पांडू आणि झिम्मा हे दोन महत्त्वाचे मराठी सिनेमे झळकले. विजू माने दिग्दर्शित 'पांडू' उत्तम कामगिरी करीत असून हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'लाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
19 नोव्हेबर रोजी 'झिम्मा' रिलीज झाला होता. सुरूवातीला याला यश कसे मिळेल अशी निर्मात्यांना धास्ती वाटत होती. मात्र प्रेक्षकांना झिम्मा आवडला. आता या सिनेमाचे चार आठवडे पार झाले आहेत आणि अनेक थिएटर्समध्ये अजूनही प्रेक्षक रांगा लावताना दिसत आहेत.
-
Despite stiff competition from #Hindi + #Hollywood films, #Marathi film #Jhimma continues to spell magic at the #BO... The week-wise performance is simply superb...
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐ Week 1: ₹ 2.98 cr
⭐️ Week 2: ₹ 2.85 cr
⭐️ Week 3: ₹ 2.61 cr
⭐ Week 4: ₹ 2.04 cr
⭐️ Total: ₹ 10.48 cr pic.twitter.com/yrOEcvufWy
">Despite stiff competition from #Hindi + #Hollywood films, #Marathi film #Jhimma continues to spell magic at the #BO... The week-wise performance is simply superb...
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2021
⭐ Week 1: ₹ 2.98 cr
⭐️ Week 2: ₹ 2.85 cr
⭐️ Week 3: ₹ 2.61 cr
⭐ Week 4: ₹ 2.04 cr
⭐️ Total: ₹ 10.48 cr pic.twitter.com/yrOEcvufWyDespite stiff competition from #Hindi + #Hollywood films, #Marathi film #Jhimma continues to spell magic at the #BO... The week-wise performance is simply superb...
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2021
⭐ Week 1: ₹ 2.98 cr
⭐️ Week 2: ₹ 2.85 cr
⭐️ Week 3: ₹ 2.61 cr
⭐ Week 4: ₹ 2.04 cr
⭐️ Total: ₹ 10.48 cr pic.twitter.com/yrOEcvufWy
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाची चार आठवड्याची कमाई 10 कोटी 48 लाख इतकी झाल्याचे ट्विट केले आहे. सिनेमाने पहिलया आठवड्यात ₹ 2.98 cr, दुसऱ्या आठवड्यात ₹ 2.85 cr, तिसऱ्या आठवड्यात ₹ 2.61 cr आणि चौथ्या आठवड्यात ₹ 2.04 cr अशी एकूण ₹ 10.48 cr इतकी कमाई झिम्माने बॉक्स ऑफिसवर केली आहे. झिम्मा या मराठी चित्रपटाची स्पर्धा बिग बजेट हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांसोबत होती. या पार्श्वभूमीवर चित्रपटाने जादू केल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Big B Batting In Kbc : 'केबीसी'चा सेट बनला 'क्रिकेट'चे मैदान, 'बिग बी'ची चौकार षटकारांची आतषबाजी