मुंबई - लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी कलाविश्वातून कलाकारही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. हिंदी सिनेसृष्टीप्रमाणेच मराठी कलाविश्वातूनही कलाकार उत्स्फुर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. तसंच इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
लोकशाहीचा उत्सव आम्ही सहकुटुंब मित्र मंडळीसह साजरा केला, तुम्ही ही साजरा करा. मतदान तुमचा हक्क आहे. तो तुम्ही बजावा, असं आव्हान अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी नागरिकांना केलं आहे. यावेळी अभिनेते जयंत वाडकर, अशोक लोखंडे यांनीही मतदान केलं.
हेही वाचा -बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
शूटिंग आणि नाटक बाजूला ठेवत मराठी कलाकारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
शुटिंग आणि नाटकाच्या प्रयोगात कायम व्यग्र असलेल्या मराठी कलाकारांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करायला मात्र आवर्जून वेळात वेळ काढला. फक्त एकट्यानेच नाही तर सहकुटुंब मतदान करून आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे.
अभिनेता प्रशांत दामले, अभिनेता पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री किशोरी शहाणे वीज, त्यांचे पती दीपक आणि मुलगा बॉबी, अभिनेते जयवंत वाडकर यांनी ही सपत्नीक मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा - बाभळगावत देशमुख कुटुंबीयांचे मतदान; रितेश-जेनेलिया ठरले आकर्षण
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा - मुग्धा वैशंपायन
रायगड - भारताचे आणि महाराष्ट्राचे नागरिक असल्याने आपण मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मी मतदान केले आहे. तुम्ही सुद्धा मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा, असे आवाहन सारेगमप लिटिल चॅम्पियन विजेता गायिका मुग्धा वैशंपायन हिने केले आहे.
अलिबागमधील कन्याशाळा येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटूंब मतदान मुग्धा वैशंपायन हिने केले.
फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका- सोनाली कुलकर्णी
पुणे - धर्म, जात या विषयावर विचार न करता उमेदवारांचे शिक्षण आणि कार्यक्षमता आहे का त्याचा विचार करून मतदान करा, असं आवाहन मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सोनालीने माध्यमांशी संवाद साधला.
दरवेळेस प्रमाणे सोनाली निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधन शाळेत ती मतदान करण्यासाठी आली होती. यावेळी तिच्यासोबत आई वडील आणि भाऊ होते. त्यांना पाहण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती.
हेही वाचा -अभिनेता अतुल कुलकर्णीने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांनीही मतदानाचा हक्क बजावला
-
Mumbai: Actress Shubha Khote after casting her vote for the Andheri West constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/mr5ATyZZIY
— ANI (@ANI) October 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Actress Shubha Khote after casting her vote for the Andheri West constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/mr5ATyZZIY
— ANI (@ANI) October 21, 2019Mumbai: Actress Shubha Khote after casting her vote for the Andheri West constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/mr5ATyZZIY
— ANI (@ANI) October 21, 2019