कोल्हापूर - जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे थैमान घातले होते. धरणांतून होणारा विसर्ग आणि नद्यांनी धारण केलेल्या रुद्रावतारामुळे पुराच्या पाण्याने निम्मे शहर व्यापले गेले. यामध्ये कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे नागरिकांच्या मदतीसाठी अनेक हात समोर आले आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारही पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत.
पूरग्रस्तांना जमेल तशी मदत करा, असे आवाहन सिनेसृष्टीतील कलाकारांनी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची मदत येथील महासैनिक दरबार हॉल याठिकाणी जमा करण्यात आली. इतर सर्व गोष्टींपेक्षा हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे अभिनेता संतोष जुवेकरने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला. शिवाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर ही भयंकर मोठी नैसर्गिक आपत्ती होती. त्यासाठी येथील पुरग्रस्तांसाठी आम्हाला सुद्धा थोडा हातभार लावता आला हे आमचे भाग्य असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपट महामंडळाचे सदस्य याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनीधी यांनी...