मुंबई - कोल्हापूर, सांगली आणि कराड परिसरात आलेल्या महापूराने लोकांचे जगणे हैराण झाले आहे. लोकांच्या घरात अजूनही पाणी आहे. लाखो लोक वाचवण्यात आले असून हजारो लोक अजूनही घरी परतू शकलेले नाहीत. अशावेळी मदत करण्यासाठी अनेक संस्था संघटनांनी पुढाकार घेतलाय. अशावेळी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका कलाकार कसे मागे राहतील. यांनीही लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रचंड मदत जमा झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मात्र या मदतीमध्ये अनेकांनी जे दान केले आहे ते पाहून मराठीतील अष्टपैलू कलाकार मंगेश देसाई चिडला आहे. लोकांनी फाटके कपडे, खराब डाळी, खराब पिठ आणि मळकटलेली भांडी असे साहित्य दान केले आहे. आधीच मोडून पडलेला संसार सावरणाऱ्या पुरग्रस्तांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना असे साहित्य दान करणे हे योग्य नाही. मदत जमा करणे शक्य नसल्यास नका करु पण असे साहित्य देऊन पुरग्रस्तांचा अपमान तरी करु नका, अशा आशयाचे कळकळीचे आवाहन मंगेशने एका व्हिडिओतून केले आहे.