नवी दिल्ली - पाकिस्तानी समाजसेविका आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजाई यांच्या जीवनावर आधारित 'गुल मकाई' हा बायोपिक दिग्दर्शक अमजद खान यांनी तयार केलाय. त्यांना अनेक धमक्या येऊनही त्यांनी चित्रपटाचे काम थांबवले नसल्याचा खुलासा केलाय. अजूनही अज्ञात मेल वरुन धमक्या येत असल्याचे ते म्हणाले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
खान म्हणतात की मलाला आता सर्वांना माहिती आहे. मात्र तालिबन्यांनी तिला २०१२ ला गोळ्या घालण्यापूर्वीची मलाला केवळ काही जणांनाच माहिती आहे.
या बायोपिकमध्ये तिचे अगोदरचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. ती जेव्हा स्वातमध्ये राहात होती तेव्हाचे तिचे आयुष्य दाखवण्यात आल्याचे अमजद खान यांनी सांगितले.
युनायटेड नेशनमध्ये गेल्या वर्षी 'गुल मकाई' चित्रपटाचा शो लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांनी दिलेली स्टँडिंग ओवेशन प्रेरणा देणारी होती. मध्यंतरामध्ये एकहीजण खाण्यासाठी सीट सोडून गेले नाहीत. प्रत्येक महिला रडत होती, असे अमजद खान यांनी सांगितले.
एवढेच नाही तर मलालाचे वडिल या शोला हजर होते. ते दुसऱ्यांदा सिनेमा पाहात होते. ते स्वतःला आवरु शकले नाहीत. भूतकाळ पुन्हा जीवंत केल्याची त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्याचेही खान यांनी सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'गुल मकाई' चित्रपट ३१ जानेवारीला भारतात रिलीज होणार आहे.