मुंबई - चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar Film ) यांचा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' ( Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha ) हा चित्रपट वादाच्या भाोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील गिरणी कामगार कुटुंबांचे विकृत चित्रण दाखवल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला आहे. त्याविरोधात महिला आयोगाने तक्रार नोंदवली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व सोशल मिडिया प्लॅटफोर्मवरून हटवला आहे.
-
NCW chief writes to I&B Ministry to censor the trailer and sexually explicit scenes of upcoming Marathi film "Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha'; condemns the open circulation of sexually explicit content involving minors on social media platforms pic.twitter.com/rWfOf6338K
— ANI (@ANI) January 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NCW chief writes to I&B Ministry to censor the trailer and sexually explicit scenes of upcoming Marathi film "Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha'; condemns the open circulation of sexually explicit content involving minors on social media platforms pic.twitter.com/rWfOf6338K
— ANI (@ANI) January 12, 2022NCW chief writes to I&B Ministry to censor the trailer and sexually explicit scenes of upcoming Marathi film "Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha'; condemns the open circulation of sexually explicit content involving minors on social media platforms pic.twitter.com/rWfOf6338K
— ANI (@ANI) January 12, 2022
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' ( Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha ) हा चित्रपट 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात दाखवलेल्या विकृत चित्रणामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने ( National Commission for Women ) त्याची तक्रार केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे केली होती. त्याच पार्श्वभुमीवर आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व सोशल मिडिया प्लॅटफोर्मवरून हटवला आहे.
मांजरेकारांना राज्य महिला आयोगाची नोटीस
महेश मांजरेकर यांनी 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' विकृत चित्रीकरणाबाबत आपली भूमिका मांडावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
पॉस्को अंतर्गत कारवाईचे राष्ट्रीय महिला आयोगाचे निर्देश
महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात महिला आणि बालकांना विषयी अतिशय विकृत चित्रण केले आहे. यामुळे पोस्को कायद्याचे उल्लंघन होत असून पोस्को कायद्यांतर्गत सात दिवसात मांजरेकर यांच्यावरील कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत
-
महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला 1/2 pic.twitter.com/RqZEfKvAAM
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला 1/2 pic.twitter.com/RqZEfKvAAM
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 13, 2022महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला 1/2 pic.twitter.com/RqZEfKvAAM
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 13, 2022
मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम
दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरवरून वादंग निर्माण झाल्यानंतरही महेश मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सिमेंटच्या जंगलातील जळजळीत वास्तव दाखवणारा हा चित्रपट असून, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या लांडग्यांना कसे भिडतात दोघेजण हे दम असेल तर पहायला या चित्रपटगृहात, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे. राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाने चित्रपटाच्या प्रोमोवर आक्षेप नोंदवत कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा - 'RRR' साठी अजय-आलियावर पैशांचा पाऊस, थोड्याशा रोलसाठी मिळाली 'इतकी' रक्कम