ETV Bharat / sitara

'सडक-२' मध्ये आलियाची असणार 'ही' भूमिका, शूटिंगपूर्वी दिग्दर्शकाचा खुलासा - sadak 2

या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पुजा भट्ट हे मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता या चित्रपटात आलियाची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दलही खुलासा करण्यात आला आहे.

'सडक-२' मध्ये आलियाची असणार 'ही' भूमिका, शूटिंगपूर्वी दिग्दर्शकाचा खुलासा
author img

By

Published : May 2, 2019, 7:28 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये बायोपिक्स सोबतच चित्रपटाचे सिक्वेल बनवण्याचाही ट्रेण्ड सुरू झाला आहे. दिग्दर्शक महेश भट्ट हे देखील त्यांचा गाजलेला 'सडक' चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहेत. तब्बल २७ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पुजा भट्ट हे मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता या चित्रपटात आलियाची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दलही खुलासा करण्यात आला आहे.

महेश भट्ट यांनी कलाकारांच्या भूमिकेवरून पडदा उठवला आहे. आलियाच्या भूमिकेविषयी त्यांनी सांगितले, की 'आलिया या चित्रपटात भोंदु बाबाविरोधात लढताना दिसणार आहे. तिच्या या कामासाठी संजय दत्त तिला मदत करणार आहे. म्हणजेच आलियाचे पात्र हे १९९२ मधील 'सडक'मध्ये संजय दत्तने जशी भूमिका साकारली होती, त्याचप्रकारची असणार आहे.

'सडक'च्या सिक्वेलच्या निमित्ताने महेश भट्ट हे तब्बल २३ वर्षानंतर दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तर, आलिया पहिल्यांदाच त्यांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकारणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे पहिले शेड्यूल हे १५ मे पासून मेहबूब स्टुडिओ येथे सुरू होणार आहे. येथे संजय दत्त आणि आलिया सोबत शूटिंग सुरू करतील. यापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग रोमानिया येथे होणार, असे बोलले जात होते. मात्र, मुंबईतूनच शूटिंग सुरू होणार असल्याचे महेश भट्ट यांनी सांगितले आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.