ETV Bharat / sitara

'हम आपके है कौन'ची २५ वर्षे पूर्ण, 'धकधक गर्ल'ने शेअर केला खास व्हिडिओ - लक्ष्मीकांत बेर्डे

माधुरीसह रेणुका शहाणे आणि अनुपम खेर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'धकधक गर्ल'ने शेअर केला खास व्हिडिओ
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:32 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन चित्रपट ज्याने वर्षानुवर्षे चाहत्यांवर अधिराज्य गाजवले अशा 'हम आपके हैं कौन' चित्रपटाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरज बडजातिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या आठवणीला उजाळा देत माधुरी दिक्षीतने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

१९९४ मध्ये ५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं अनेक अॅवॉर्डही मिळवले. चित्रपटात निशा आणि प्रेम हे आयकॉनिक पात्र साकारणाऱ्या माधुरी आणि सलमान खानची केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. या दोघांशिवाय मोहनिश बहल, रेणूका शहाणे, अनुपम खेर, रिमा लागू, अलोकनाथ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे यांच्याही मुख्य भूमिका पाहायला मिळाल्या.

माधुरीसह रेणुका शहाणे आणि अनुपम खेर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या चित्रपटात तब्बल १४ गाणी आहेत. यातील ११ गाण्यांना लता मंगशेकर यांनी आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट ९० च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.

आजही या चित्रपटाची जादू काही कमी झालेली नाही. कॉमेडीसोबतच फॅमिली पॅक असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली होती. त्यामुळेच २५ वर्षांनंतरही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.