ETV Bharat / sitara

रोहन गोडांबे यांचा लाइन प्रोडयुसर ते निर्माता असा थक्क करणारा प्रवास! - Rohan Godambe latest news

केवळ छंद किंवा हौस म्हणून काम करणारे आणि त्या हौसचे संधीत रूपांतर करणारे फार क्वचित असतात. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड आणि जिद्द या बळावर कार्यकारी निर्माता ते निर्माता असा आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू करणारे रोहन गोडांबे यांची गोष्ट ही चित्रपटातल्या नायकासारखी आहे.

रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास
रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास
author img

By

Published : Jan 17, 2022, 10:24 PM IST

मुंबई - ‘अगर किसी चिजको दिलसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है’ हा शाहरुख खान चा चित्रपटातील संवाद खऱ्या आयुष्यातही तितकाच खरा आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मनोरंजनसृष्टीत कार्यरत असणाऱ्या रोहन गोडांबे यांचं देता येईल. केवळ छंद किंवा हौस म्हणून काम करणारे आणि त्या हौसचे संधीत रूपांतर करणारे फार क्वचित असतात. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड आणि जिद्द या बळावर कार्यकारी निर्माता ते निर्माता असा आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू करणारे रोहन गोडांबे यांची गोष्ट ही चित्रपटातल्या नायकासारखी आहे.

रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास
रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास

लाइन प्रोडयुसर ते कार्यकारी निर्माताते निर्माता हा त्यांचा प्रवास थकक करणारा आहे. २२ वर्षे इंडस्ट्रीत प्रचंड काम केल्यानंतर आलेल्या अनुभवातून त्यांनी स्वत:च्या ‘असमथी प्रोडक्शन्स’ या निर्मीती संस्थेअंतर्गत काही वेबसिरीज आणि मराठी चित्रपटांच्या निर्मीतीची धुरा उचलली आहे. लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येइल. चित्रपटसृष्टीत तसा कोणताही गॉडफादर नसताना रोहन गोडांबे यांनी आपल्या मार्गदर्शकांची साथ,घरच्यांचा पाठींबा आणि जिद्दीच्या जोरावर चित्रपट निर्मितीच्या स्वप्नाची मजल गाठली आहे.

एखादी घडी नीट नसेल तर परफेक्ट चौकट तयार होत नाही चित्रपटाचे सुद्धा गणित जमवायचे असले तर व्यवस्थापनेची घड़ी नीट हवी. मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आईची असते. सगळी व्यवधान सांभाळून व्यवस्थापनेचे कौशल्य दाखविणाऱ्या आईप्रमाणे कार्यकारी निर्मात्यालाही चित्रपटरूपी गोंडस बाळाची काळजी घ्याची असते. चित्रपटाच्या घोषणेपासून ते प्रदर्शनापर्यंत कार्यकारी निर्मात्याची भूमिका अहम ठरते. ‘जिद्द’ आणि 'पुढे जायचं' ही इच्छा धरून रोहन गोडांबे यांनी आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू केला. या प्रवासात बिपीन नाडकर्णी यांचे मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरले. मिळालेल्या संधीचं सोनं करत आज इंडस्ट्रीत रोहन गोडांबे हे नाव होताना दिसतंय.

रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास
रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास

‘अपने हौंसले को कभी मत बताओ कि तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है अपनी तकलीफ को यह बताओ की तुम्हारा हौसला कितना बड़ा है’! या उक्तीनुसार शालेय जीवनापासून कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तींच्या सानिध्यात कलेचे धड़े गिरवत आपला प्रवास करणाऱ्या रोहन यांना अभिनयापेक्षा बॅकस्टेज सांभाळण्याची कसरत अधिक आवडू लागली. या आवडीतून त्यांचा चित्रपटसृष्टीचा श्रीगणेशा घडला. रोहन गोडांबे यांनी आपली क्षमता, आपले प्रयत्न ह्यांतून आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला.

‘उत्तरायण’ ‘एवढंस आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक ‘पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘यलो’, ’न्यूड’, ‘डोक्याला शॉट’, ‘विकून टाक’, अलीकडचा ‘बीटरस्वीट’ या दर्जेदार मराठी चित्रपटांसोबत झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’, आंतरराष्ट्रीय फिल्म ‘नोरा’ यासारख्या चित्रपटांच्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जाहिरणक्षेत्रातही ‘त्यांनी बरचं काम केलं आहे.

रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास
रोहन गोडांबे यांचा जीवनप्रवास

आपल्या प्रवासाबद्दल बोलताना रोहन म्हणाला की, ‘गुणात्मकता आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. हिंदी चित्रपटसृष्टीची काम करण्याची शिस्त, त्यांचे नियोजन या सगळ्या गोष्टी आत्मसात करून खूप काही शिकता आलं. माझ्या प्रत्येक कामातल्या अनुभवातून काही ना काही शिकायला मिळालं. सुंदर प्रवास होता हा. मला तर वाटतं की, प्रत्येक चित्रपट हाच एक टर्निंग पॉइंट होता. ही सगळी शिदोरी घेऊन माझ्या निर्मीतीची पुढची वाटचाल मी पार करत प्रेक्षकांना वेगळं काहीतरी चांगल देणार हे नक्की’!

हेही वाचा - हेमा मालिनी, सुभाष घई, अमजद अली खान यांनी बिरजू महाराजांना वाहिली श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.