ETV Bharat / sitara

'लाईफ बियॉन्ड रिल' : सुपरस्टार दैवत... 'एनटीआर'! - सुपरस्टार दैवत... 'एनटीआर'!

'लाईफ बियॉन्ड रिल'मध्ये आम्ही नंदामुरी तराका रामा राव म्हणजेच 'एनटीआर' यांच्या रॉयल जीवनाची झलक सादर केली आहे. तेलुगु सिनेमाच्या या सुपरस्टारने चमचमत्या दुनियेला रामराम ठोकला आणि राजकारणात प्रवेश करत जनतेचे आदर्श बनले. त्यांच्या जीवनातील अनेक चढउतारांबद्दल जाणून घेऊयात.

Peoples god NTR
नंदामुरी तराका रामा राव
author img

By

Published : Dec 5, 2019, 8:04 PM IST

आंध्र प्रदेशातील राजकारण एनटीआर यांच्या काळात अनेक बदलांचे साक्षीदार ठरले. त्यांनी सिनेमा जगत आणि राजकारणाचा असा काही स्वाद चाखला की त्यांच्यासम तेच. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सिनेजगताला अलविदा केले होते पण संपर्क कायम होता.

एनटीआर या वेगळ्या व्यक्तीमत्वाने आंध्रच्या जनतेवर गारुढ केले होते. तेलुगु भाषिकांसाठी त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. यानंतर केवळ ९ महिन्यातच त्यांचा पक्ष सत्तास्थानी पोहोचून इतिहास रचला. त्यांच्या पक्षाच्या नव्या अस्तित्वामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अधोरेखीत झाले. त्यांनी संपूर्ण देशाला तेलुगु समुदायाकडे सन्मानाने पाहायला भाग पाडले.

एनटीआर यांनी पडद्यावर साकारलेल्या पौराणिक भूमिका त्यांची राजकिय कारकिर्द बहरण्यासाठी उपयुक्त ठरल्या. तब्बल १७ चित्रपटतून त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. गंमत म्हणजे मुख्यमंत्री असतानाही काही वेळा ते पौराणिक वेशभूषा परिधान करत असत. त्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आणि आदर होता.

Peoples god NTR
नंदामुरी तराका रामा राव

आंध्रच्या किनारपट्टीला बसलेल्या जबरदस्त वादळाच्या तडाख्याने एनटीआर यांचे जीवन बदलून गेले. यात नुकसान झालेल्या परिसराला त्यांनी भेट दिली आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांना उमगले. खुद्द श्रीकृष्णच आपल्या मदतीला धावून आल्याची भावना यावेळी वादळात नुकसान झालेल्या जनतेची होती. त्यानंतर एनटीआर यांनी जनतेला मदतीचे आवाहन केले आणि त्यांना प्रचंड उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी तर आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने त्यांच्या झोळीत मदत म्हणून दिले. विशेष म्हणजे ५ लाख घरांची बांधणी त्यांनी या मदतीतून केली. या घटनेने त्यांची संपूर्ण राज्यभर वेगळी प्रतिमा निर्माण झाली, याचा लाभ त्यांना राजकारणात झाला. जनतेने त्यांच्या तेलुगु देसम पक्षाला बहुमत दिले आणि एनटीआर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. १५ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांचे राजकारणातील योगदान इतिहासाच्या नेहमीच स्मरणात राहील.

Peoples god NTR
नंदामुरी तराका रामा राव

आंध्र प्रदेशमध्ये स्पेशल कंमाडो फोर्स स्थापन करण्यापासून ते २ रुपये किलो तांदुळ उपलब्ध करण्यापर्यंत आणि नक्सलवाद संपवण्यासाठी उचललेल्या पावलांची विशेष नोंद घेतली जाते. त्यांच्या कारकिर्दीत हैदराबादमधील जातीय दंगली शांत झाल्या.

ऑल टाइम ग्रेटेस्ट लेजेंड एनटीआर यांनी तेलुगू सिनेमालाही आपले अमूल्य योगदान दिले आहे. पूर्वीच्या काळात तेलुगु सिनेमांची निर्मिती मद्रासमध्ये होत असे. एनटीआर यांनी ही इंडस्ट्री हैदराबादला शिफ्ट केली. त्यातून आज तेलुगु इंडस्ट्रीतील निर्माते, वितरक, तंत्रज्ञ, कलाकार यांची किती प्रगत झाली आहे याची जाणीव होते. याचा पाया एनटीआर यांनी घातला होता.

एनटीआर यांची फिल्म कारकिर्द

एनटीआर यांनी आपल्या फिल्म करियरची सुरूवात 'मना देसम' या चित्रपटातून १९४९ मध्ये केली. यात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी बी. ए. सुब्बाराव दिग्दर्शित ‘पल्लेतुरी पिल्ला’ चित्रपटात काम केले. याला मिळालेल्या जबरदस्त यशाने त्यांचा लौकिक वाढला. त्यानंतर आलेल्या ‘माया बाजार’ चित्रपटात त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली. या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर त्यांनी अनेक पौराणिक चित्रपटात वेगवेगळ्या हिंदू देवतांच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या राम, कृष्ण, भीष्म, अर्जुन, कर्ण, दुर्योधन, विष्णु, शिव या पौराणिक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनल्या.

Peoples god NTR
नंदामुरी तराका रामा राव

नंतरच्या काळात एनटीआर यांनी साकारलेल्या बंडखोर नायकाच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या. व्यवस्थेविरुध्द बंड करणारा नायक प्रेक्षकांना भावला. यापैकी ‘देवुदु चेसिना मनुशुलु’, ‘अदावी रामुडु’, ‘ड्राईवर रामुडु’, ‘वेतागादु’, ‘सरदार पापा रायुडु’, ‘जस्टिस चौधरी’ चित्रपटातील त्यांच्या बंडखोर व्यक्तीरेखा लोकांच्या पसंतीस उतरल्या.

एनटीआर यांनी चित्रपटांचे कथा आणि पटकथा लिहिल्या आहेत. राजकारणात प्रवेश केल्यानंतरही त्यांचा चित्रपटसृष्टीशी संपर्क कायम राहिला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एनटीआर यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.