मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री कियारा आडवाणीचीही या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. कियाराने शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
कियाराने शेअर केलेला हा फोटो चित्रपट निर्माती शबिना खान यांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमारसह चित्रपटाच्या टीमचा समावेश आहे.
अभिनेता तुषार कपूर यानेदेखील एक फोटो शेअर केला आहे. तो या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. तसेच, त्याने या चित्रपटात भूमिका देखील साकारली आहे. अक्षय कुमार, कियारा आडवाणीसोबतच शरद केळकर, अश्विनी कळसेकर आणि तरुण अरोरा यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा चित्रपट तमिळ हॉरर असलेल्या 'मुनी २ - कंचना'चा हिंदी रिमेक आहे. राघव लॉरेन्स यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २२ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अक्षय - कियाराचे आगामी चित्रपट -
अक्षयचे यावर्षी 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बॉम्ब' आणि 'पृथ्वीराज' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर, कियारा आडवाणी ही 'भूल भुलैय्या २', 'शेरशाह', 'इंदू की जवानी' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.