मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबरला त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला. आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादिदींनी नुकतंच इन्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. त्यांचं आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर कोणतही अधिकृत पेज नव्हतं. मात्र, आता त्यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण करुन आपला पहिला फोटोही शेअर केला आहे.
लतादिदिंची बहिण मीना खादिकर यांनी स्वत: लिहलेलं 'दिदी और मै' हे पुस्तक लतादिदींना भेट दिलं आहे. या पुस्तकासोबतच त्यांनी आपला फोटो शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -पाहा, 'बायपास रोड' चित्रपटाचा चित्तथरारक ट्रेलर
ट्विटर अकाऊंटवर लतादिदी बऱ्यापैकी सक्रिय आहेत. मात्र, आता इन्स्टाग्रामद्वारेही त्या आपल्या चाहत्यांशी आपले अपडेट्स शेअर करणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विशेष म्हणजे, एकाच दिवसात त्यांचे इन्स्टाग्रामवर ५० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.
हेही वाचा -कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रुपात असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का?