मुंबई - बॉलिवूड निर्माता करण जोहर यांनी ब्रम्हास्त्र टीमच्या वेतनात कपात करणार असल्याच्या बातमीचे खंडन केले आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा आगामी ब्रम्हास्त्र हा चित्रपट अडकला आहे. त्यामुळे यावर काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या पगारात कपात केली असल्याची अफवा पसरली आहे. यावर करण यांनी आपले मत मांडले.
कोणत्याही निष्कर्षाला पोहोचण्यापूर्वी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी असा सल्लाही त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना दिला आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याच्यासारखे प्रसिध्द कलाकार भूमिका करीत आहेत. यात नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाचे नुकसान होऊ नये यासाठी यातील कलाकारांनी स्व इच्छेने आपल्या वेतनात कपात केल्याची बातमीदेखील आहे. अफवेनुसार रणबीर, आलिया आणि अयान यांनी आपल्या वेतनात कपात केली आहे.
आता करण जोहरने याबाबत खुलासा केला आहे.
-
My hugest request to my media friends not to reach any assumptions on our fraternity films...these are challenging times for the business and false news only makes the situation worse! Please wait for official news on any account!! This is a humble request....
— Karan Johar (@karanjohar) May 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My hugest request to my media friends not to reach any assumptions on our fraternity films...these are challenging times for the business and false news only makes the situation worse! Please wait for official news on any account!! This is a humble request....
— Karan Johar (@karanjohar) May 4, 2020My hugest request to my media friends not to reach any assumptions on our fraternity films...these are challenging times for the business and false news only makes the situation worse! Please wait for official news on any account!! This is a humble request....
— Karan Johar (@karanjohar) May 4, 2020
करण जोहरने ट्विट करीत लिहिलंय, ''मीडियाच्या माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, सिनेमाबाबत कोणत्याही निष्कर्षाला पोहोचू नका. हा व्यवसायासाठी आव्हानाचा प्रसंग आहे आणि खोट्या बातम्या परिस्थिती बिघडवून ठेवतात. कोणत्याही विषयासंबंधी अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रतीक्षा करा. हे नम्र निवेदन आहे.''
'ब्रह्मास्त्र : पार्ट वन' - हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड़ आणि मळ्यालम आदी पाच भाषामध्ये रिलीज होणार आहे.