ETV Bharat / sitara

Confirm: 'भूल भूलैय्या'च्या सिक्वेलमध्ये कार्तिकसोबत किआराची वर्णी, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - kiara aadvani

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटामधील कार्तिकचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. 'भूल भूलैय्या'मध्ये अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेत तो झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Confirm: 'भूल भूलैय्या'च्या सिक्वेलमध्ये कार्तिकसोबत किआराची वर्णी, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
author img

By

Published : Sep 21, 2019, 1:45 PM IST

मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी या दोघांचीही 'भूल भूलैय्या २' मध्ये वर्णी लागली आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'भूल भूलैय्या' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटामधील कार्तिकचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. 'भूल भूलैय्या'मध्ये अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेत तो झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'भूल भूलैय्या २'चं दिग्दर्शन अनिस बझ्मी करत आहेत. या चित्रपटातील भूमिकेबाबत किआराने सांगितलं, की 'भूल भूलैय्याच्या सिक्वेलमध्ये भूमिका साकारण्यासाठी मी फार उत्सुक आहे. अनिस बझ्मी यांच्या दिग्दर्शनाखाली हा माझा पहिलाच चित्रपट आहे. भूल भूलैय्या हा चित्रपट मी पाहिलेला सर्वात हॉरर चित्रपट होता. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये मला संधी मिळाल्यामुळे मी फार आनंदी आहे. शिवाय, कार्तिकसोबतही भूमिका साकारायला मिळणार असल्यामुळे मी फार उत्सुक आहे'.

  • IT'S OFFICIAL... Kiara Advani roped in for #BhoolBhulaiyaa2... Stars Kartik Aaryan... Directed by Anees Bazmee... Produced by Bhushan Kumar, Murad Khetani and Krishan Kumar... 31 July 2020 release.

    — taran adarsh (@taran_adarsh) September 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -Public Review: प्रेक्षकांवर झोया - दुलकरच्या जोडीची भूरळ, 'झोया फॅक्टर'बद्दल दिल्या प्रतिक्रिया

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती शेअर केली आहे. पुढच्या वर्षी ३१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

सध्या कार्तिक आर्यन त्याच्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तसेच 'आजकल' चित्रपटातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता 'भूल भूलैय्या'च्या सिक्वेलमध्ये त्याची भूमिका कशी असेल, हे पाहणं रंजक ठरेल.

हेही वाचा -Public Review: करण देओल - सहिर बांबाच्या 'पल पल दिल के पास'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

Intro:Body:

ashwini

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.