मुंबई - कन्नडमधील बहुचर्चित चित्रपट 'KGF: Chapter 2' चा थिएटरिकल ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यश-स्टाररच्या ट्रेलरने २४ तासांत पाच भाषांमध्ये १०९ दशलक्ष व्ह्यूजसह सर्वाधिक पाहिलेला भारतीय ट्रेलर बनून विक्रम प्रस्थापित केल्याचे वृत्त आहे.
सोशल मीडियावर मोठी बातमी शेअर करताना निर्मात्यांनी अभिमानाने सांगितले की, ''रेकॉर्ड, रेकॉर्ड, रेकॉर्ड. रॉकीला ते आवडत नाही, तो टाळतो, पण रेकॉर्डला रॉकी आवडतो. तो त्यातून सुटू शकत नाही. कन्नड: 18 दशलक्ष, तेलगू: 20 दशलक्ष, हिंदी: 51 दशलक्ष, तमिळ: 12 दशलक्ष, मल्याळम: 8 दशलक्ष.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, धमाकेदार अॅक्शन आणि प्रशांत नीलचे अनपेक्षित दिग्दर्शन यावर प्रेक्षक, विशेषत: रॉकिंग स्टार यशचे चाहते फिदा झाले आहेत. या ट्रेलरने चित्रपटाला अधिक प्रसिद्धी दिली आहे.
'KGF: Chapter 2' मध्ये बॉलिवूडचे दिग्गज कलाकार संजय दत्त आणि रवीना टंडन प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. 'KGF: Chapter 2' कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
KGF: Chapter 2 चे लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे, तर विजय किरागांडूर यांनी होंबळे फिल्म्स बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि एए फिल्म्सद्वारे उत्तर-भारतीय मार्केटमध्ये सादर केला जात आहे.
हेही वाचा - आयएएस टॉपर टीना दाबीचा ग्लॅमरस लूक, सौंदर्यात कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही