मुंबई - दाक्षिणात्य सिनेस्टार यश याच्या 'केजीएफ' चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता 'केजीएफ चाप्टर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या फर्स्ट लूकमध्ये त्याचा दमदार लूक पाहायला मिळतो.
यशने 'केजीएफ' चित्रपट 'रॉकी भाई'ची भूमिका साकारली होती. याच अवतारात तो 'केजीएफ चाप्टर २' मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्याबरोबरच सोशल मीडियावर तो ट्रेण्ड झाला आहे.
-
Here it is... First look poster of #KGFChapter2... Stars #Yash, #SanjayDutt and #SrinidhiShetty. #KGFChapter2FirstLook pic.twitter.com/R6GK0dbiDq
— taran adarsh (@taran_adarsh) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Here it is... First look poster of #KGFChapter2... Stars #Yash, #SanjayDutt and #SrinidhiShetty. #KGFChapter2FirstLook pic.twitter.com/R6GK0dbiDq
— taran adarsh (@taran_adarsh) December 21, 2019Here it is... First look poster of #KGFChapter2... Stars #Yash, #SanjayDutt and #SrinidhiShetty. #KGFChapter2FirstLook pic.twitter.com/R6GK0dbiDq
— taran adarsh (@taran_adarsh) December 21, 2019
हेही वाचा -प्रभूदेवा, वरुण धवन, श्रद्धा कपूरच्या डान्सची जादू, पाहा 'स्ट्रीट डान्सर'चं मुकाबला गाणं
'केजीएफ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. कन्नड सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणूनही या चित्रपटाला ओळखले गेले. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या चित्रपटाचे शूटिगं पूर्ण होईल. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
हेही वाचा -अॅक्शन अवतारासाठी आयुष्यमान करणार चार महिने तयारी
बरोबर एक वर्षापूर्वी 'केजीएफ' चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता वर्षभरातच या चित्रपटाच्या सिक्वेलचेही शूटिंगही पूर्ण होईल. त्यामुळे चाहत्यांना आता सिक्वेलची आतुरता आहे.