ETV Bharat / sitara

..अन् कॅटरिनाने सलमानला लग्नासाठी केलं प्रपोज, व्हिडिओ व्हायरल - ali abbas jafar

कॅटरिना आणि सलमान खानच्या एकेकाळी रिलेशनशिपच्या चर्चा देखील सुरू होत्या. मात्र, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे दोघेही अनेकदा सांगतात. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' या चित्रपटातही या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

..अन् कॅटरिनाने सलमानला लग्नासाठी केलं प्रपोज, व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : May 26, 2019, 4:46 PM IST

Updated : May 26, 2019, 5:12 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानच्या लग्नाची चाहत्यांना बऱ्याच दिवसापासून आतुरता आहे. मात्र, सलमान खान नेहमी लग्नाकडे दुर्लक्ष करताना दिसतो. त्याचे आजवर बऱ्याच अभिनेत्रींशी नाव जोडले गेले आहे. त्याची आणि कॅटरिनाची जोडी देखील प्रेक्षकांना फार आवडते. त्या दोघांनी एकत्र यावे, अशीही चाहत्यांची इच्छा आहे. तर, चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. खुद्द कॅटरिनानेच सलमान खानला लग्नाची मागणी घातली आहे.

विश्वास नाही ना बसत, पण होय, चाहत्यांची कॅटरिना आणि सलमान खानचे लग्न पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात नाही, तर त्यांच्या आगामी 'भारत' या चित्रपटात दोघांच्याही लग्नाचा सीन दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. नवनवे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कॅटरिना सलमानला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'भारत'चा नवा प्रोमो

कॅटरिना आणि सलमान खानच्या एकेकाळी रिलेशनशिपच्या चर्चा देखील सुरू होत्या. मात्र, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे दोघेही अनेकदा सांगतात. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' या चित्रपटातही या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता 'भारत' चित्रपटातही ते एकत्र येणार असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे.
येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यावर्षीचा सुपरहिट चित्रपट राहणार आहे, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Intro:Body:

ent news 09

Conclusion:
Last Updated : May 26, 2019, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.