मुंबई - बॉलिवूडचा हॅन्डसम हंक कार्तिक आर्यन आज २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या आईवडिलांकडून त्याला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज मिळालं. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
कार्तिक सध्या एकापाठोपाठ एक अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आईवडिलांना सरप्राईझ भेट देऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी खास सजावटही केली होती. तसेच केक कापून वाढदिवसाचा आनंद लुटला.
हेही वाचा -हॅप्पी बर्थडे कार्तिक आर्यन....
कार्तिकने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनीही प्रतीक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा -'द बॉडी' चित्रपटातील दुसरं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित, पाहा इमरान हाश्मी- वेदिकाची केमेस्ट्री