ETV Bharat / sitara

भांडणानंतर पहिल्यांदा एकत्र आले कपिल आणि सुनील, पाहा फोटो - Salman khan meets Kapil Sharma and sunil Grover

२० डिसेंबरला सोहेल खानचा वाढदिवस होता. या निमित्ताने गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर दोघांनीही हजेरी लावली होती.

Kapil Sharma and sunil Grover together with Salman khan
भांडणानंतर पहिल्यांदा एकत्र आले कपिल आणि सुनील, पाहा फोटो
author img

By

Published : Dec 22, 2019, 2:33 PM IST

मुंबई - कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना टाळत होते. मागच्या वर्षी त्यांचे विमानात भांडण झाले होते. त्यानंतर सुनीलने कपिल शर्मा शो सोडला होता. दोघेही एकमेकांसमोर येणंही टाळत होते. मात्र, सलमान खानमुळे दोघेही पुन्हा एकदा एकत्र आले. दोघांचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२० डिसेंबरला सोहेल खानचा वाढदिवस होता. या निमित्ताने गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर दोघांनीही हजेरी लावली होती. दरम्यान सलमानने दोघांनाही जवळ बोलावले. तसेच दोघांसोबत फोटोही काढला. कपिल शर्माने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. भांडणानंतर हा त्यांचा पहिला एकत्रित फोटो आहे.

हेही वाचा -इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहाने एक्स बॉयफ्रेंडसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडिओ

सुनील ग्रोवरने सलमान खानसोबत 'भारत' चित्रपटात भूमिका साकारली आहे. तर, कपिल शर्माच्या शोच्या निर्मितीची जबाबदारी देखील सलमान खानने घेतली होती. त्यामुळे यावेळी कपिल शर्मा शोमध्ये सुनील आणि कपिल पुन्हा एकदा दिसतील, अशी आशा प्रेक्षकांना होती. सुनीलचे या शोमधील डॉ. गुलाटी हे पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीचे आहे. मात्र, सुनील या कार्यक्रमात नसल्यामुळे हे पात्र देखील काढुन टाकण्यात आले आहे.

हेही वाचा -'सौदा खरा खरा' गाण्यामागची धमाल मस्ती, अक्षय कुमारने शेअर केला मेकिंग व्हिडिओ

Intro:Body:

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.