मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत अलिकडेच 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता या चित्रपटानंतर ती पुन्हा 'थलायवी' या बायोपिकच्या शूटिंगकडे वळली आहे. या चित्रपटात ती जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी ती तिच्या लुकवर विशेष मेहनत घेत आहे. तिच्या लुकवर मेहनत घेणाऱ्या हेअरस्टायलिस्ट मारिया शर्मा यांना बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन कंगनाने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
Kangana Ranaut celebrated her hair dresser, Maria Sharma's 50 years of working in the film industry. Maria has worked with her in #Fashion, #OnceUponATimeInMumbai #WohLamhe and now in #Thalaivi.
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations Maria on your golden jubilee!! pic.twitter.com/pVS1ZQoTWe
">Kangana Ranaut celebrated her hair dresser, Maria Sharma's 50 years of working in the film industry. Maria has worked with her in #Fashion, #OnceUponATimeInMumbai #WohLamhe and now in #Thalaivi.
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) January 30, 2020
Congratulations Maria on your golden jubilee!! pic.twitter.com/pVS1ZQoTWeKangana Ranaut celebrated her hair dresser, Maria Sharma's 50 years of working in the film industry. Maria has worked with her in #Fashion, #OnceUponATimeInMumbai #WohLamhe and now in #Thalaivi.
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) January 30, 2020
Congratulations Maria on your golden jubilee!! pic.twitter.com/pVS1ZQoTWe
मारिया शर्मा यांनी तब्बल ५ दशकं बॉलिवूडमध्ये हेअरस्टायलिस्टचं काम केले आहे. हेलन, हेमा मालिनी, शर्मिला टागोर यांसारख्या बऱ्याच अभिनेत्रींच्या लुकवर त्यांनी काम केले आहे. कंगनाने त्यांच्यासोबत 'वो लम्हे' आणि 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' याही चित्रपटांसाठी काम केले आहे.
हेही वाचा -'पृथ्वीराज' चित्रपटातील गाण्याचे शूटिंग पूर्ण, मानुषीने शेअर केली झलक
मारिया यांना शुभेच्छा देत कंगनाने आपला 'थलायवी' चित्रपटातला लुक शेअर केला आहे. यामध्ये तिचा ट्रॅडिशनल लुक पाहायला मिळतो.
या चित्रपटाचे शूटिंग मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. यामध्ये जयललिता यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास ते राजकीय घडामोडी दाखवण्यात येणार आहे.
तमिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. २६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर बायोपिक बनवण्याची इच्छा - अश्विनी अय्यर तिवारी