मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी सकाळी तिच्या मेक्सिको प्रवासातील एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. समुद्राच्या काठावर वाळूत पाठमोरी बसलेली कंगना यात दिसते. चाहत्यांनी यावर भरपूर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे कंगना सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. यावर नेटकऱयांना कंगनाने आणखी एका पोस्टने प्रत्युत्तर दिले आहे.
कंगनाचे ट्रोलकर्त्यांना पोस्टद्वारे प्रत्युत्तर
कंगनाने केलेल्या दुसऱया पोस्टमध्ये आपल्या बिकिनी फोटोचा उल्लेख केला आहे. त्यावर तिने कट्टर हिंदूत्ववाद्यांना आणि सनातन विचारसरणीच्या लोकांना धारेवर धरले आहे. यावर बोलताना कंगना म्हणते, काही लोकं माझा बिकिनीतला फोटो बघून मला धर्माचे ज्ञान देत आहेत. समजा कधी देवी भेरवी आपले केस मोकळे सोडून विवस्त्र.. दुष्टांचं मर्दन करणाऱ्या रुपात समोर आली असती तर मग अशावेळी तुमचे काय होईल? तुम्ही स्वत:ला भक्त समजत आहात. धर्माचे पालन करा. त्याचे ठेकेदार होऊ नका... जय श्रीराम.
सुरुवातीला केलेली पोस्ट
कंगना रनौतने तिच्या चाहत्यांसाठी मेक्सिकन सुट्टीतील आकर्षक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मेक्सिकोच्या युकाटिन द्वीपकल्पातील कॅरेबियन किनारपट्टीवरील तुलुम बेटावरील वाळूत ती पाठमोरी बसलेली दिसते. या फोटोत कंगनाने गुलाबी आणि निळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. मेक्सिकोच्या तुलुम बेटावर ती सुट्टीचा आनंद घेत असतानाचा हा थ्रोबॅक फोटो आहे.
“गुड मॉर्निंग मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात भेट दिलेल्या सर्वात रोमांचक जागांपैकी एक म्हणजे मेक्सिको, सुंदर परंतु एक अकल्पित ठिकाण नाही, मेक्सिकोमधील हे छोटे बेट तुळमचा एक फोटो आहे,” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
ेहही वाचा - विचित्र अपघात : फुल्ल स्पीडमध्ये असताना मालगाडी धावली २४ किलोमीटर उलटी
हेही वाचा - मुंबई : मनपाकडून कोरोना काळात १२५० कोटींचा खर्च; निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची भाजपची मागणी